घरदेश-विदेशCovid-19 Vaccine चे दोन डोस घेतले तरच ऑफिसात मिळणार एन्ट्री; ओडिशा सरकारचा...

Covid-19 Vaccine चे दोन डोस घेतले तरच ऑफिसात मिळणार एन्ट्री; ओडिशा सरकारचा निर्देश

Subscribe

कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान ओडिशा सरकारने भुवनेश्वरमधील सर्व राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलैपासून कार्यालयात येण्यापूर्वी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला देखील कळविण्यात आले आहे. या संदर्भात जारी केलेल्या नोटिसमध्ये असे म्हटले आहे की, भुवनेश्वरमधील सर्व विभाग आणि कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांना १ जुलै २०२१ पासून नियमितपणे कार्यालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे. जर एखादा कर्मचारी वैद्यकीय किंवा इतर कोणत्याही अनिवार्य कारणामुळे लसी देण्यास असमर्थ असेल तर त्याला किंवा तिला विभाग प्रमुखांकडे सूट मिळेल, मात्र यापूर्वी तसा अर्ज मिळाल्यावर त्या बाबीचा विचार करण्यात येईल, असे देखील प्रशासनाकडून सांगितले आहे.

अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना कर्मचार्‍यांना सुरक्षित कामकाजाचे वातावरण उपलब्ध करून देणे हे या आदेशाचे उद्दीष्टे आहे. ज्या कर्मचार्‍यांनी कोरोना लस घेतली नसेल त्यांना १ जुलै २०२१ पासून कार्यालयात येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे सांगितले आहे. विशेषतः भुवनेश्वरमधील सर्व विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम १० ते २० जून २०२१ रोजी घेण्यात आली.

- Advertisement -

या प्रक्रियेत साधारण ६ हजार कर्मचार्‍यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. कर्मचार्‍यांच्या संपूर्ण लसीकरणासाठी लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा १७ जून २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे. सर्व विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांना अशी विनंती करण्यात आली की, १ जुलै २०२१ पासून भुवनेश्वर येथे असलेल्या कार्यालयांच्या सर्व कर्मचार्‍यांना संपूर्ण लसीकरण पूर्ण करण्यात यावे.


कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे ‘या’ देशात कहर; सर्वाधिक रूग्णांची नोंद

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -