जम्मू – काश्मीरमध्ये ३ जवान शहीद

जम्मू – काश्मीरमध्ये ३ जवान शहीद

संग्रहित छायाचित्र ( फोटो सौजन्य - PTI )

जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३ जवानांना वीर मरण आले आहे. तर एका जवानाची प्रकृती ही अत्यवस्थ आहे. जम्मू – काश्मीरमधील राजौरी जिल्हामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये ही चकमक झाली. यामध्ये ३ जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, जखमी जवानाला उदमपूरच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी झालेल्या चकमकीमध्ये जवानांना वीरमरण आहे. भारतीय सैन्य पेट्रोलिंग करत असताना दहशतावाद्यांनी डाव साधत जवानांवर हल्ला केला. जवानांनी देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तानच्या बॅट अर्थात बॉर्डर अॅक्शन टीमचा देखील यामध्ये सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात देखील जवानांना यश आले आहे. लाईन ऑफ कंट्रोल जवळ ही चकमक झाली. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांकडून २ एके – ४७ रायफलसह काही शस्त्रास्त्र देखील जप्त करण्यात आलेली आहेत. यानंतर सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी देखील बॅटनं भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली होती. पाकड्यांच्या वाढत्या कुरापती पाहता भारतानं न्यु यॉर्कमध्ये उभयपक्षांमध्ये होणारी चर्चा देखील रद्द केली होती. त्यानंतर पाकड्यांच्या अंगाचा तीळपापड झाला होतात.

 जशास तसे उत्तर 

सीमेपलिकडून दिवसेंदिवस पाक पुरस्कृत दहशतवाद्यांची घुसखोरी वाढत आहे. त्याला भारतीय जवान देखील चोख प्रत्युत्तर देत आहेत. आज ( शनिवारी ) देखील शोपियन जिल्हामध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांना भारतीय जवान देखील चोख प्रत्युत्तर देत आहेत. मागील आठवड्याभरात १० दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यास लष्कराला यश आले आहे. पाकिस्तानकडून देखील वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्याला देखील चोख प्रत्युत्तर सैन्याकडून दिले जात आहे. दरम्यान, सरकारनं देखील हयगय करू नका असे आदेश सैन्याला दिले आहेत.

वाचा – कुलगाममध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

First Published on: October 21, 2018 7:11 PM
Exit mobile version