कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; ३५ जणांचा मृत्यू, ४८ जण जखमी

कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; ३५ जणांचा मृत्यू, ४८ जण जखमी

इराणचा टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत. अमेरिकेने शुक्रवारी पहाटे बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईहल्ला करून इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला ठार मारले. त्यामुळे आखातात तणाव निर्माण झाला. दरम्यान या हल्ल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले क्षण इराकमधील अलहद टीव्हीने जारी केले. दरम्यान, एअर स्ट्राइकमध्ये जनरल कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला होता. त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे.

‘सूटातला दहशतवादी’

इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला ठार केल्यानंतर अमेरिका आणि इराणचे संबंध धोकादायक पातळीला पोहोचले आहेत. दरम्यान, आता इराणने अमेरिकेच्या सर्व सैन्यदलांना दहशतवादी घोषित केले आहे. इराणचे मंत्री मोहम्मद जावाद अझारी जाहरोमी यांनी ट्रम्प यांना ‘सूटातला दहशतवादी’, असे म्हटले आहे.

नक्की काय घडले?

इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी असणाऱ्या सुलेमानीसहीत काही लष्करी अधिकाऱ्यांचा ताफा इराकची राजधानी बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होता. याच ताफ्यावर अमेरिकेने ड्रोनच्या माध्यमातून हवाईहल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचे कमांडर मेजर जनरल असणाऱ्या सुलेमानीचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात सुलेमानीसह अन्य आठ जण ठार झाले.


हेही वाचा – तात्काळ इराक सोडून परत या!


 

First Published on: January 7, 2020 4:19 PM
Exit mobile version