CoronaVirus: दिल्लीत ३६५ नवे कोरोनाचे रुग्ण, त्यापैकी ३२५ निजामुद्दीन मरकजचे!

CoronaVirus: दिल्लीत ३६५ नवे कोरोनाचे रुग्ण, त्यापैकी ३२५ निजामुद्दीन मरकजचे!

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीत आढळले आहेत. गेल्या २४ तासात दिल्लीत कोरोनाचे ३५६ नवे रुग्ण आढळले आहेत. राजधानी दिल्लीत एका दिवसात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीत कोरोना ३५६ रुग्ण आढळल्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ५१०वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ३५६ नवीन रुग्णांची झाली असून त्यापैकी ३२५ रुग्णांचा निजामुद्दीन मरकजशी संबंध आहे. तसंच एकूण १५१० कोरोनाग्रस्तांच्या संख्यापैकी १०७१ कोरोना रुग्णांचा संबंध तबलीग जमातशी आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीत गेल्या २४ तासात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच आतापर्यंत कोरोनामुळे मृतांचा आकडा २८वर पोहोचला आहे. तर ३० कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत दिल्लीतील एकूण १ हजार ५१० कोरोनाच्या रुग्णांपैकी ३७७ रुग्ण हे परदेशातून आले आहे आणि काही रुग्णांचा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे. तसंच ६२ रुग्ण यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत अजूनही शोध घेतला जात आहे.

दिल्लीमध्ये आतापर्यंत १५ हजार ३२ लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १ हजार ५१० जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असून १२ हजार २८३ लोकांचा निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे. तसंच १ हजार ८ जणांचे अजूनही रिपोर्ट यायचे बाकी आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: स्वाइन फ्लूपेक्षा १० पटीने जास्त कोरोना व्हायरस जीवघेणा – WHO


 

First Published on: April 13, 2020 11:40 PM
Exit mobile version