घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: स्वाइन फ्लूपेक्षा १० पटीने जास्त कोरोना व्हायरस जीवघेणा - WHO

CoronaVirus: स्वाइन फ्लूपेक्षा १० पटीने जास्त कोरोना व्हायरस जीवघेणा – WHO

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे लोकांच्या भीतीत अजूनच भर पडले. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या नवीन अहवालात स्वाइन फ्लूपेक्षा कोरोना व्हायरस १० पटीने जीवघेणा असल्याचं सांगितलं आहे. स्वाइन फ्लूला एच१एन१ असं देखील म्हटलं जात. २००९ मध्ये स्वाईन फ्लू सर्वत्र पसरला होता.

डिजीटल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिनेव्हा येथील जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखे टीड्रोस अधानम घेब्रेयेसस यांनी स्पष्ट केली की, कोविड-१९ फैलाव सर्वत्र मोठ्या प्रमाणात होत आहे, हे आम्हाला माहित आहे. २००९ मधील स्वाईन फ्लूच्या १० पटीने कोरोना व्हायरस अधिक जीवघेणा आहे.

- Advertisement -

आतापर्यंत जगात १८ लाख ९९ हजरा ७३६ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १ लाख १७ हजार ७६१ जणांचा मृत्य झाला आहे. तर अजूनही ४२ हजार ३६६ जण गंभीर आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत ४ लाख ३५ हजार ६२९ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहे.

जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत. अमेरिकेत कोरोनाचे ५ लाखांहून अधिक रुग्ण सापडले असून मृतांचा आकडा २२ हजारहून अधिक आहे. त्यापाठोपाठ स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनी या देशात १ लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. सध्या भारतात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा संख्या ९ हजारहून अधिक झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LockDown: रस्त्यावर सांडलेल्या दुधासाठी कुत्र्यांसह माणूस एकत्र; व्हायरल व्हिडिओ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -