Corona Update: देशातील कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला २८ हजारांचा टप्पा!

Corona Update: देशातील कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला २८ हजारांचा टप्पा!

प्रातिनिधीक फोटो

देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील काही दिवसांपासून ३० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३७ हजार १४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५५ हजार १९१वर पोहोचला आहे. यापैकी आता २८ हजार ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७ लाख २४ हजार ५७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ४ लाख २ हजार ५२९ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

 

२० जुलैपर्यंत देशात १ कोटी ४३ लाख ८१ हजार ३०३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी काल ३ लाख ३३ हजार ३९५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.

देशात महाराष्ट्रातील कोरोना मृत्युदर सर्वाधिक आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ९ हजार ५१८ रुग्ण आढळून आले होते. यानंतर आता महाराष्ट्राचा मृत्युदरही देशात सर्वाधिक असल्याची बाब निदर्शनास आली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ११ हजार ८५४ नागरिक बळी पडले आहेत. सध्या राष्ट्रीय पातळीवरील कोरोनाचा मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. मात्र, महाराष्ट्रात हाच दर ३.८२ टक्के आहे. राज्याच्यादृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी राज्याच्या इतर भागांमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.


हेही वाचा – Corona: ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा ८० हजार पार!


 

First Published on: July 21, 2020 9:40 AM
Exit mobile version