थायलंडच्या गुहेतून ८ मुलांना बाहेर काढण्यात यश

थायलंडच्या गुहेतून ८ मुलांना बाहेर काढण्यात यश

८ मुलांना गुहेतून बाहेर काढले

थायलंडच्या थान लुआंग गुहेमध्ये कोचसह अडकलेल्या फुटबॉल टीममधील आणखी ४ मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. गेल्या १६ दिवसापासून १३ जणांची ही फुटबॉटची टीम गुहेमध्ये अडकली आहे. रविवारी संध्याकाळी गुहेतून ४ मुलांना बाहेर काढण्यात आले होते. गुहेमध्ये अडकलेल्या इतर मुलांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. ही फुटबॉलची टीम २३ जूनला गुहा पाहण्यासाठी गेली होती. पावसामुळे आलेल्या पुरामध्ये ती गुहेमध्येच अडकली. गुहेत अडकलेली मुलं ११ ते १६ वयोगटातील आहेत.

आणखी ५ जणांचा शोध सुरु

थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या मुलांपैकी आतापर्यंत ८ मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. पुराचे पाणी ओसरल्यामुळे बचावकार्याला वेग आला आहे. आणखी ५ जणांच्या सुटकेची प्रतिक्षा आहे. या गुहेमध्ये आणखी ४ मुलं आणि फूटबॉलचे प्रशिक्षक आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहे. गुहेतून बाहेर काढण्यात आलेल्या मुलांची प्रकृती चांगली आहे. गुहेतून सुखरुप सुटका झाल्यामुळे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आपल्या मुलांना पाहून त्यांच्या कुटुंबियांच्या देखील जीवात जीव आला.

इतर मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

बचाव मोहिमेचे प्रमुख आणि चिआंग राय प्रांताचे गव्हर्नर नारोंगसॅक यांनी सांगितले आहे की, “आज देखील रविवार सारखीच परिस्थिती आहे. रविवारी पाऊस पडला होता. मात्र गुहेमध्ये पाणी पातळी वाढली नाही त्यामुळे बचाव कार्य करणे सोपे गेले. रविवारी जवळपास १२ तास चाललेल्या बचाव अभियानामध्ये १८ ड्रायव्हर्सनी ४ मुलांना बाहेर काढले. तर आज ४ मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. गुहेत अडकलेल्या मुलांचे सध्याचे ठिकाण पटाया बीच जवळ आहे.”

 

गुहेत राहिल्याने मुलं गारठली

गेल्या १६ दिवसापासून या गुहेमध्ये ही फुटबॉलची टीम अडकली आहे. बाहेर काढण्यात आलेल्या मुलाची प्रकृती जरी चांगली असली तरी ते गुहेत फार काळ राहिल्याने गारठले आहेत. त्यांच्या हाता आणि पायाला जखमा झाल्या आहेत. नेव्हीच्या जवानांनी त्यांच्या जखमांना ताबडतोब औषध लावले. या सर्व मुलांना चिआंग राय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून ही मुलं भूकेली आहेत. बाहेर आल्यानंतर या मुलांनी फ्राईड राईसची मागणी केली.

९० ड्रायव्हर्सकडून बचावकार्य सुरु

या बचाव मोहिमेमध्ये थायलंड व्यतिरिक्त अमेरिका, चीन, जपान, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशाचे ९० ड्रायव्हर्स सहभागी आहेत. ४० ड्रायव्हर्स थायलंडमधील आहेत तर, इतर ५० ड्रायव्हर्स इतर देशाचे आहेत. जवळपास एक हजार जवान आणि एक्सपर्ट या अभियानामध्ये मदत करत आहेत.

संबंधित बातम्या – 

थायलंडच्या गुहेत बारा मुलं पाच दिवसांपासून बंद

Video: गुहेत अडकलेले १२ फुटबॉलर्स जिवंत!

First Published on: July 9, 2018 8:14 PM
Exit mobile version