घरदेश-विदेशथायलंडच्या गुहेत बारा मुलं पाच दिवसांपासून बंद

थायलंडच्या गुहेत बारा मुलं पाच दिवसांपासून बंद

Subscribe

थायलंडच्या 'लुआँ नांग नोन' या गुहेमध्ये पाच दिवसांपासून बारा मुलं अडकले आहेत. थायलंड सैन्य युद्धपातळीवर या मुलांचा शोध घेत आहे. परंतु, मुसळधार पावसामुळे या शोध कार्यात अडचणी येत आहे.

थायलंडच्या ‘लुआँ नांग नोन’ या गुहेमध्ये बारा लहान मुले अडकले आहेत. शनिवारपासून ते या गुहेत असून घटनेला आता पाच दिवस होत आले आहेत. परंतु अद्यापही त्या मुलांचा तपास लागलेला नाही. या मुलांना वाचवण्यासाठी थायलंडच्या सुरक्षा यंत्रणाही कसून मेहनत करत आहेत. त्याचबरोबर या गुहेच्या बाहेर देवाला प्रार्थना करण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली आहे. गुफेत अडकलेल्या मुलांच्या आई-वडिलांना विश्वास आहे की, त्यांची मुले सुरक्षित आहेत.

युद्ध पातळीवर मुलांचा शोध सुरु

गुहेत अडकलेली बाराही मुले फुटबॉल खेडाळू आहेत. शनिवारी ते आपल्या कोचसोबत गुहेमध्ये गेले. सर्व मुले ११ ते १६ वर्ष वयोगटातील आहेत. गुहेमध्ये प्रवेश करतेवेळी आपण यातून बाहेर येऊ शकणार नाही, असा अंदाज या मुलांना आला नसावा. आता या मुलांना बाहेर काढण्यासाठी सुमारे १ हजार लोक घटनास्थळी पोहोचले असून मुलांचा कसून शोध घेत आहेत. यामध्ये सैन्य दलाची उच्चस्तरीय टीम सुद्धा आहे. थायलंड सरकार या मुलांचे युद्ध पातळीवर शोध घेत आहे. थायलंडचे पंतप्रधान यांना आशा आहे की, ते बाराही मुले आणि त्यांचा प्रशिक्षक सुरक्षित असतील.

- Advertisement -

मुसळधार पावसामुळे शोध कार्यात अडचण

थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे गुहेच्या प्रवेशद्वारजवळ पाणी साचले आहे. त्यामुळे ते सर्व मुले गुहेच्या आत गेले आहेत, असे सांगितले जात आहे. थायलंडच्या सैनिकांनी त्या गुहेच्या बाहेर पाण्याचा पंप लावला असून त्या पंपामार्फत पाणी बाहेर काढले जात आहे. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे मुले गुहेच्या आणखीन आत गेले असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे. या बचाव कार्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पावसामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत. या शोध कार्यात हवाई दलाचे सैनिक देखील आहेत. सुमारे १ हजार सैनिक मुलांचा शोध घेत आहेत. मंगळवारी नौदलाचे काही सैनिक ऑक्सिजन सिलेंडर आणि काही खाद्यपदार्थ घेऊन गुहेमध्ये गेली. मंगळवारी नौदलाने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले होते की, ‘आज सकाळ पासून आमची टीम गुहेच्या आत गेली आहे आणि ते गुहेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतील’. नौदलाने सांगितले की, ‘मुसळधार पावसामुळे गुहेत १५ सेंटीमीटर पर्यंत पाणी साचले आहे’. या दरम्यान, हवामान विभागाने बुधवारी मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

गुहेत ऑक्सिजनचे प्रमाण घटत चालले

थायलंडच्या राज्यपालांनी सांगितले आहे की, ‘गुहेमधून पंप लावून पाणी काढले जात आहे. परंतु, तरीही पाण्याचा पातळी वाढत चालली आहे. या गुहेमध्ये अडकलेल्या मुलांची आणि त्यांच्या कोच जिवंत राहावे यासाठी संपूर्ण थायलंड देवाकडे प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर गुहेमध्ये पाण्याची पातळी वाढल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -