यूपीत कारखान्याच्या आगीत 4 जणांचा मृत्यू; सीएम योगींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत

यूपीत कारखान्याच्या आगीत 4 जणांचा मृत्यू; सीएम योगींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत

उत्तर प्रदेशमधील वारणसीत एक धक्कादायक घटना घडली आहे. वारणसीमधील अश्फाक नगर परिसरा असलेल्या एका साडी कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.

साडी कारखान्यातील साडी फिनिशिंगच्या कामाच्या खोलीत अन्न शिजवत असताना आग लागली. सिलेंडरच्या स्फोटामुळं आग लागल्याचं समजतं. गुरूवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अश्फाक नगर दुर्घटनेची दखल घेतली. तसंच यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती निधीतून चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली.

या घटनेत या घटनेत मदनपूर येथील 45 वर्षीय व्यक्ती, त्याचा 22 वर्षीय मुलगा आणि बिहारमधील अररिया येथे राहणाऱ्या 18 आणि 17 वर्षांच्या दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे.. या 4 जणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, साडी कारखान्यातील साडी फिनिशिंग रूममध्ये साड्या, फोम आणि फिनिशिंग मटेरियल ठेवण्यात आल्याचं समजतं. तसंच काही कृत्रिम पदार्थही त्याठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामुळं आग अधिक वेगानं पसरली. याप्रकरणी पोलिसांनी चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


हेही वाचा – पवारांची समाजकारणातील अन् राजकारणातील भूमिका सगळ्यांना माहिती, दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांवर पलटवार

First Published on: April 14, 2022 5:53 PM
Exit mobile version