Video: गुजरातच्या केमिकल कंपनीत स्फोट, ५ कामगारांचा मृत्यू

Video: गुजरातच्या केमिकल कंपनीत स्फोट, ५ कामगारांचा मृत्यू

गुजरातमध्ये केमिकल कंपनीत स्फोट

गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील दहेज येथे एका केमिकल कंपनीच्या बॉईलरमध्ये स्फोट झाल्याने कंपनीत कामाला असलेल्या ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास ३२ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे परिसरात लांबच लांब धुराचे लोट काही काळ दिसत होते. सर्व जखमी कामगारांना भरुचमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती भरुचचे जिल्हाधिकारी एमडी मोडिया यांनी दिली.

भरुच येथील यशस्वी रसायन प्रायव्हेट लिमिटेड या किटकनाशक बनविणाऱ्या कंपनीत हा स्फोट घडला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, या कंपनीतील केमिकल आरोग्यास घातक आहेत. त्यामुळे कंपनीच्या बाजुला असणाऱ्या लाखी आणि लुवारा या गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

या स्फोटाची भीषणता इतकी होती की, जवळपास २० किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे आवाज ऐकू गेले होते. स्फोट इतका मोठा होता की, आजुबाजुच्या कंपनीतील काचेच्या खिडक्याही फुटल्या. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे १५ बंब हजर झाले होते. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

First Published on: June 3, 2020 5:03 PM
Exit mobile version