BSF Soldiers Firing : बीएसएफच्या मुख्यालयात अंदाधुंद गोळीबार, ५ जवानांचा मृत्यू तर १ जखमी

BSF Soldiers Firing : बीएसएफच्या मुख्यालयात अंदाधुंद गोळीबार, ५ जवानांचा मृत्यू तर १ जखमी

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील बीएसएफ मुख्यालयात रविवारी सकाळी एका जवानाने आपल्या सहकारी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला.या घटनेत ५ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १ जवान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत फायरिंग करणाऱ्या जवानाचाही मृत्यू झाला आहे. जखमी जवानांना गुरू नानक देव रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत ६ जवानांना गोळी लागली होती. गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव १४४ बटालियनचे कॉन्स्टेबल सत्तेप्पा एसके असे आहे. या घटनेनंतर सत्तेप्पाने स्वत:वरही गोळी झाडली.

गेल्या काही दिवसांपासून सत्तेप्पा खूप त्रस्त होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली ड्यूटी बदलावी यासाठी प्रयत्न करत होता. शनिवारी सत्तेप्पाचा बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी वादही झाला. यानंतर रविवारी सकाळी ड्यूटीवर असताना सत्तेप्पाला अचानक राग आला आणि रागाच्या भरात बंदुकीतून गोळीबार सुरू केला. यामध्ये १० जवानांना गोळ्या लागल्या. त्यानंतर सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर बीएसएफकडून एक प्रेस रिलीजदेखील जारी करण्यात आली आहे. यात घनटेच्या चौकशीच्या कोर्ट ऑफ इंक्वायरीचा आदेशही देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

जखमी जवानांची प्रकृती जाणून घेण्यासाठी पोहोचले IG

IG बॉर्डर आसिफ जलाल गुरूनानक देव रूग्णालयात जखमी झालेले जवान निहाल सिंग आणि राहुल यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी पोहोचले. यावेळी आयजी म्हणाले की, परस्पर शत्रुत्व आणि गटबाजी नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आयजींच्या भेटीनंतरच जखमी झालेल्या राहुल यांना दुसऱ्या स्थानी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.


हेही वाचा :PM Modi Pune Tour Live Update: मोबाईल उत्पादन भारत अग्रेसर – पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

First Published on: March 6, 2022 4:32 PM
Exit mobile version