घरताज्या घडामोडीLive Update: युक्रेनमधील अणु प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, पुतीन यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना...

Live Update: युक्रेनमधील अणु प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, पुतीन यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना माहिती

Subscribe

युक्रेनमधील अणु प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, पुतीन यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना माहिती


पुणे मेट्रोत पंतप्रधान मोदींनी दिव्यांग मुलांशी साधला संवाद

- Advertisement -

कोरोना महामारीत मुंबईत पहिल्यांदा ५० पेक्षा कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत मागील २४ तासात  ४६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

राज्यात मागील २४ तासात ३६२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ३ रुग्णांचा आज राज्यात मृत्यू झालाय.


मोबाईल उत्पादन भारत अग्रेसर – पंतप्रधान नरेंद्र मोदी


सिम्बॉयसिस संस्थेचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले


प्रकल्प पूर्ण करणाऱ्यावर अधिक भर दिला पाहिजे – पंतप्रधान मोदी


पुण्याची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख – पंतप्रधान मोदी


मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरमध्ये मेट्रोचा वेगाने विस्तार – पंतप्रधान मोदी


मेट्रोमुळे पुणेकरांचे राहणीमान उंचावेल – पंतप्रधान मोदी


अनेक काम वेगाने करण्यासाठी दोन्ही महापौरांना शुभेच्छा – पंतप्रधान मोदी


काम वेळेत होऊ शकते हे आम्ही दाखवून दिलं – पंतप्रधान नरेंद्र मोदी


देशाच्या इतिहास पुण्याचे मोठे योगदान – पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला केली सुरुवात

#Live: पुण्यातील विकास कामांच्या उद्धघाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन

#Live: पुण्यातील विकास कामांच्या उद्धघाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, March 5, 2022


मोठ्या पदांवरील व्यक्तींनी न शोभणारी वक्तव्य करू नये, असं म्हणतं अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना लगावला टोला


नागपूरप्रमाणे इतर शहरातील मेट्रो प्रकल्प लवकर पूर्ण करा – अजित पवार


मेट्रोच्या कामात राजकारण करू नका – अजित पवार


पुणे मेट्रो सुरू व्हायला १२ वर्ष लागली – उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार


देशात पुणे शहर पाचव्या क्रमांकावर – महापौर मुरलीधर मोहोळ


अनेक वर्षांपासून पुणेकरांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात पूर्ण झालं – महापौर मुरलीधर मोहोळ


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठा जनसमुदाय पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात दाखल


पंतप्रधान नरेंद्र मोदी एमआयटी महाविद्यालयात दाखल


थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे महापालिकेच्या विकासकामांचे उद्घाटन करणार


पुण्यातील आनंदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले


पंतप्रधान मोदींनी तिकीट काढून मेट्रोतून केला प्रवास


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोला दाखवला हिरवा झेंडा


थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार


पंतप्रधान मोदी यांनी वादग्रस्त शाही फेटा घातला आहे. या शाही फेट्यावर राजमुद्रा लावल्यामुळे काँग्रेसने तीव्र विरोध केला आणि त्यानंतर फेट्यावरील राजमुद्रा काढण्यात आली.


पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे महापालिकेत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी देखील उपस्थित आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ इत्यादी नेतेमंडळी उपस्थित आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे महापालिकेच्या दिशेने रवाना


थोड्याच वेळात पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल


पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. पुण्यात मोदींविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आंदोलन करत आहे. मोदी गो बॅक अशा घोषणा दिल्या जात आहेत.


युक्रेनमध्ये अडकलेल्या 183 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान हंगेरीमधील बुडापेस्ट येथून दिल्लीत पोहोचले.


युक्रेनमधून २१० भारतीयांची सुखरुप सुटका. रोमानिया येथून २१० भारतीयांना घेऊन उड्डाण करणारे भारतीय हवाई दलाचे विमान दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर पोहोचले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण होणार आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या विविध योजनांचंही ऑनलाईनद्वारे उद्घाटन केलं जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी आज पुणे दौर्‍यात कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करणार आहेत. तसेच ते मेट्रोने आनंदनगरपर्यंतचा प्रवास करणार आहेत.


राज्यात उद्यापासून ९ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -