देशात ७ लसी कोरोनाशी लढणार, येणाऱ्या १० दिवसांत रशियाच्या लसीला मिळणार परवानगी

देशात ७ लसी कोरोनाशी लढणार, येणाऱ्या १० दिवसांत रशियाच्या लसीला मिळणार परवानगी

देशात ७ लसी कोरोनाशी लढणार, येणाऱ्या १० दिवसांत रशियाच्या लसीला मिळणार परवानगी

२०२१च्या सुरुवातीलाच कोरोना संदर्भात अनेक दिलासा देणाऱ्या गोष्टी घडल्या. त्या म्हणजे दोन लसींना आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर या दोन लसी १६ जानेवारीपासून देशातील नागरिकांना देण्याास सुरुवात झाली. त्या दोन लसी म्हणजे भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिस्ट्यूची कोविशिल्ड. सध्या देशात लसीचा तुटवडा भासत असला तरी याच दरम्यान केंद्र सरकारने लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी एक पाउल उचलेल आहे. ऑक्टोबरपर्यंत देशात कोरोनाच्या पाच लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती, एएनआयच्या सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच रशियात विकसित होणार स्पुटनिक व्ही लसीला येणाऱ्या १० दिवसांत परवानगी मिळू शकते.

येत्या काळात कोणत्या ५ लसी येणार?

एएनआयच्या माहितीनुसार, २०२१च्या तिमाहीमध्ये आखणीन पाच लसी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये स्पुटनिक व्ही लस, जॉन्सन अँड जॉन्सन लस, नोव्हाव्हॅक्स लस, भारत बायोटेकची इंट्रानेजल लस, झायडस कॅडिलाची लस यांचा समावेश आहे.

कोणती लस कधीपर्यंत येईल?

सरकारच्या सुत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, स्पुटनिक व्ही भारतात जूनपर्यंत येईल. तसेच जर काही ठीक असेल तर जॉन्सन अँड जॉन्सन लस ऑगस्टपर्यंत येईल. झायडस कॅडिलाची लस ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता आहे. शिवाय नोव्हाव्हॅक्स सप्टेंबरपर्यंत आणि ऑक्टोबरप्रयंत भारतात उपलब्ध होऊ शकते.

लवकरच स्पुटनिक व्हीला मिळणार परवानगी

रशियात विकसित झालेली स्पुटनिक व्ही लसीला येत्या १० दिवसांमध्ये आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळू शकते. रशियाचे डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडने भारताच्या अनेक फार्मा कंपनीसोबत लस तयार करण्यासाठी हात मिळवला आहे. भारतामध्ये या लसीचे दर वर्षी ८५ कोटी डोस तयार केले जाऊ शकतात.


हेही वाचा – केंद्राचा मोठा निर्णय! रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली


 

First Published on: April 11, 2021 6:50 PM
Exit mobile version