देशातील 50 टक्के तरुण 2050 पर्यंत जॉबसाठी होतील अनफिट? AIIMSच्या अहवालातून खुलासा

देशातील 50 टक्के तरुण 2050 पर्यंत जॉबसाठी होतील अनफिट? AIIMSच्या अहवालातून खुलासा

देशातील 50 टक्के तरुण 2050पर्यंत जॉबसाठी अनफिट असतील असा धक्कादायक खुलासा दिल्लीतील एम्सच्या रुग्णालयाकडून करण्यात आला आहे. कारण कोरोनाच्या कालावधीनंतर लहान मुलांमध्ये मायोपियाच्या प्रकरणांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.

नेमके काय आहे एम्सच्या अहवालात? 

देशात आलेल्या कोरोनाच्या महामारीनंतर तरुणाईमधील ऑनलाइन क्लासेस, स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटरवर गेम खेळण्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुलांचे डोळे कमकुवत होत आहेत. एम्सच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीपूर्वी जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा शहरी लोकसंख्येतील 5 ते 7 टक्के मुलांमध्ये मायोपिया आढळून आला होता. परंतु कोरोनाच्या कालावधीनंतर झालेल्या अभ्यासात ही संख्या 11 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

दरम्यान, ”मुलांमध्ये डिजिटल स्क्रीनचे व्यसन आणि अवलंबित्व असेच राहिले तर 2050 पर्यंत देशातील 50 टक्के मुले मायोपियाने ग्रस्त होतील. अशा परिस्थितीत देशाची निम्मी लोकसंख्या कमी दृष्टीमुळे सैन्य आणि पोलिसात भरती होण्यास अपात्र ठरेल”, असे एम्स दिल्लीच्या राजेंद्र प्रसाद आय हॉस्पिटलचे प्रमुख प्रोफेसर जीवन एस तितियाल यांनी सांगितले.

“मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी शाळांमध्ये प्रशिक्षण आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. यासाठी मुलांना शाळांमधून तासाभराची सुट्टी मिळणे आवश्यक असून, डिजिटल स्क्रीनचा वापर दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त करू नये. खराब दृष्टी असल्यास चष्मा घालण्याची खात्री करा. असे न केल्यास दृष्टी अधिक कमकुवत होते. यासोबतच मुलांनी वर्षातून एकदा डोळे तपासले पाहिजेत”, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – ‘मातोश्रीतून युवा सेनेच्या टीमला फोन केले गेले आणि…’ नरेश म्हस्केंचे अप्रत्यक्षरित्या ठाकरेंवर आरोप

First Published on: March 12, 2023 8:09 PM
Exit mobile version