अबब! ५० फूटाचं कासव…

अबब! ५० फूटाचं कासव…

सुदर्शन पटनायक याने साकारलेले वालुकाशिल्प

सुदर्शन पटनायक हे नाव कोणलाच नवीन नाही. आपल्या शिल्पांच्या माध्यामातून सुदर्शनने आजपर्यंत नेहमीच जगाला संदेश दिला आहे. आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सुदर्शननं ओडिसामधील पुरी समुद्रकिनाऱ्यावर ५० फूट उंच आणि ३० फूट रुंद इतक्या मोठ्या कासवाचं शिल्प काढलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे #BeatPlasticPollution हा संदेश त्यानं या शिल्पातून सर्वांपर्यंत पोहचवायचा प्रयत्न केला आहे.

सामाजिक विषयातून सुदर्शनचा संदेश
अगदी लहान समूहदेखील जगामध्ये बदल करण्यास कारणीभूत ठरतो. त्याप्रमाणेच जागतिक महत्त्वाचे अनेक विषय सुदर्शन आपल्या शिल्पांच्या माध्यमातून हाताळत असतो. ग्लोबल वॉर्मिंग, सेव्ह टायगर, सेव्ह गर्लचाईल्ड, एड्स जनजागृती यांसारखे सामाजिक विषय असोत किंवा ओसामा बीन लादेनची हत्या, मायकल जॅक्सनचा अकस्मात मृत्यू यांसारख्या महत्त्वाच्या घडामोडी असोत, सुदर्शन आपल्या सहका-यांसह वालुकाशिल्पांच्या माध्यमातून हे विषय नेहमीच कल्पकतेने मांडत आला आहे.

प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी वालुकाशिल्पकलेचा आधार
या जागतिक पर्यावरणाच्या दिवशीदेखील सुदर्शननं प्लास्टिक प्रदुषणासारख्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. संदेश देण्यासाठी त्यानं कल्पकता वापरली आहे. या वालुकलाशिल्पाच्यामध्ये त्यानं प्लास्टिक बाटल्यांचा योग्य वापर करत सुंदर कलाकृती तयार केली आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोचत आहे. त्यासाठी प्रत्येकानं वैयक्तिक स्तरावर पावलं उचलायला हवीत. त्यासाठी सुदर्शननं अतिशय वेगळ्या तऱ्हेनं हे वालुकाशिल्प तयार केलं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहचावा यासाठी त्यानं या कासवाचा व्हिडिओदेखील आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
या त्याच्या वालुकाशिल्पकलेला थोड्याच अवधीत १२ सेकंदाच्या या व्हिडिओला ५२०० व्ह्यूज मिळाले आहेत.

 

First Published on: June 5, 2018 6:56 AM
Exit mobile version