Cocaine Seized : मिठाच्या आडून इराणमधून मुंद्रा बंदरावर ‘कोकेन’ ड्रग्सची आयात; DRI कडून 500 कोटींचा साठा जप्त

Cocaine Seized : मिठाच्या आडून इराणमधून मुंद्रा बंदरावर ‘कोकेन’ ड्रग्सची आयात; DRI कडून 500 कोटींचा साठा जप्त

Cocaine Seized : मिठाच्या आडून इराणमधून मुंद्रा बंदरावर 'कोकेन' ड्रग्सची आयात; DRI कडून 500 कोटींचा साठा जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पुन्हा एकदा गुजरातमधील मुंद्रा बंदरात (Mundra Port) मिठाच्या नावाखाली आणलेला जाणारा 52 किलोचे कोकेन साठा जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ड्रग्सची ही खेप इराणमार्गे गुजरातमधील मुंद्रा विमानतळावर (52 kg cocain seized in gujarat) पाठवण्यात आली होती. 2021-22 या वर्षात महसूल गुप्तचर संचालनालयाने आतापर्यंत 3200 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. (Mundra Port DRUGS)

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना अमली पदार्थांची मोठी खेप इराणमार्गे भारतात पाठवली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरआयने गुप्त कारवाई सुरू केली. ज्याला ऑपरेशन नमकीन असे नाव देण्यात आले. ऑपरेशनमध्ये मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, तपास यंत्रणा DRI ला 25 मेट्रिक टन सामान्य मिठाच्या खेपेत ड्रग्स असल्याचा संशय आला. हा ड्रग्स साठा गुजरातमधील मुंद्रा बंदरात आला होता. इराणमधून मुंद्रा बंदरात आयात केलेल्या या मिठाच्या खेपेत 1000 गोण्यांचा समावेश होता. (Mundra adani port drugs)

संशयाच्या आधारावर 24 मे ते 26 मे 2022 पर्यंत डीआरआय अधिकाऱ्यांनी मीठाच्या खेपेची कसून तपासणी केली. या तपासणीत मिठाच्या काही गोण्या संशयास्पद आढळून आल्या. कारण या पिशव्यांमध्ये पावडरच्या स्वरूपात एक वैशिष्ट्यपूर्ण दुर्गंधीयुक्त पदार्थ आढळून आला होता. संशयावरून, डीआरआय अधिकार्‍यांनी या संशयित पिशव्यांतील पदार्थांचे नमुने घेतले आणि गुजरातच्या फॉरेन्सिक सायन्स संचालनालयाच्या प्रयोगशाळेत त्यांची चाचणी केली.

प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चाचणीत या पिशव्यांमध्ये कोकेन ड्रग्स असल्याचे आढळून आले. त्यानंतर झालेल्या झडतीदरम्यान 52 किलो कोकेन जप्त करण्यात आले. कोकेन जप्त केल्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदींनुसार तपास आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तसेच ही खेप कोणत्या कंपनीने मागवली होती आणि ती कुठे होती, याचाही सखोल तपास सुरू आहे. यापूर्वीही मुंद्रा बंदरात इराणमार्गे अमली पदार्थांची आलेली मोठी खेप जप्त करण्यात आली होती. (52 kg cocain seized in gujarat)

DRI अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात DRI ने देशभरातून 321 किलो कोकेन जप्त केले होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 3200 कोटी रुपये आहे. गेल्या काही महिन्यांत डीआरआयने अंमली पदार्थांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची नोंद केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.


हेही वाचा : मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, संभाजीराजेंची माघार


First Published on: May 27, 2022 1:17 PM
Exit mobile version