कर्नाटक : कारवार समुद्राध्ये बोट बुडून सहा जणांना जलसमाधी

कर्नाटक : कारवार समुद्राध्ये बोट बुडून सहा जणांना जलसमाधी

कारवारमध्ये बोट बुडून ६ जण बुडाले

कर्नाटकातील कारवार समुद्राध्ये बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट बुडल्याने आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये २६ प्रवासी असल्याची माहिती समोर आली असून त्यातील १७ जणांना बोटीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर एका प्रवाशाचा शोध सुरु आहे. ही घटना आज सकाळी घडली होती. बोट बुडाल्याची बातमी आसपासच्या गावांमध्ये पसरल्याने एकच खळबळ उडाली. या ठिकाणी कोळी बांधव आणि तटरक्षक दल यांनी मिळून आठ मृतदेह बाहेर काढले आहेत.

मृतांची नावे

निलेश रोहिदास पेडणेकर, चंदा अंकोलेकर, कुमार, गणपती कोठारकर, अण्णाक्का इंगलकर, तीन वर्षीय बालक

बेपत्ता

श्रेयस पावसकर

First Published on: January 21, 2019 6:16 PM
Exit mobile version