छत्तीसगडच्या भिलाई स्टील प्लँटमध्ये स्फोट; ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

छत्तीसगडच्या भिलाई स्टील प्लँटमध्ये स्फोट; ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

भिलाई स्टील प्लँटमध्ये स्फोट

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये असणाऱ्या भिलाई स्टील कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. मंगळवारी सकाळी कंपनीमध्ये गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर १४ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरु आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट

मंगळवारी सकाळी झालेल्या या स्फोटानंतर पोलीस आणि बचाव दलाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. या स्फोटामध्ये जखमी झालेल्या १४ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भिलाई स्टील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीमध्ये कोक ओवनच्याजवळ कर्माचारी काम करत होते. त्याच दरम्यान अचानक पाईप लाईनचा स्फोट झाला. या स्फोटात ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

First Published on: October 9, 2018 1:46 PM
Exit mobile version