यामुळे सासऱ्याला करावे लागले २१ वर्षीय सूनेशी लग्न

यामुळे सासऱ्याला करावे लागले २१ वर्षीय सूनेशी लग्न

अनेकदा मुलांना आपल्या आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन लग्न करावे लागते. मुलांचा नकार असताना देखील आई-वडिलांच्या जबरदस्तीने लग्नाच्या मांडवात मुलगा नवरदेव म्हणून उभा राहतो. अनेकदा मुलं आपल्या आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन लग्नाला तयार होतात. मात्र ते लग्न होईपर्यंत आई-वडिलांच्या मनात भीती असते. आपला मुलगा लग्न करेल कि नाही? मांडवातून पळून नाही ना जाणार असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत असतात आणि असे झाल्यास त्याचा संपूर्ण दोष आई-वडिलांना येतो. अनेका मुल लग्न टाळण्यासाठी मांडवातून पळून जाण्याचा देखील निर्णय घेतात. मुलांवर जबरदस्ती करुन त्यांना लग्नासाठी उभे करणे एका वडिलांना चांगलेच महागात पडले आहे. ऐनवेळी मांडवातून नवरदेवाने पळ काढल्याने चक्क सासऱ्याला सूनेशी लग्न करावे लागले असल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले?

बिहारमधील समस्तीपूर येथे एका ६५ वर्षीय सासऱ्याला २१ वर्षीय तरुणीशी लग्न करावे लागले. ऐन मांडवातून नवरदेव लग्नातून पळून गेल्याने चक्क सासऱ्याला तिचा नवरदेव म्हणून मांडवात उभे राहण्याची त्यांच्यावर वेळ आली. रोशन लाल (६५) असे सासऱ्याचे नाव आहे. लग्नाच्या दिवशी नवर देव त्याच्या प्रियसीसोबत पळून गेला. आता काय करावे असा प्रश्न दोन्ही मंडळींच्या समोर उपस्थित राहिला. त्यानंतर या मंडळीने चर्चा करुन अखेर सासऱ्याशी लग्न करण्याचा मार्ग निवडला आहे आणि २१ वर्षीय तरुणीचा तिचे सासरे रोशन लाल यांच्याशी तिचा विवाह सोहळा पार पडला.

First Published on: October 8, 2018 6:32 PM
Exit mobile version