Major Earthquake Mexico: मेक्सिकोमध्ये पुरानंतर ७.१ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

Major Earthquake Mexico: मेक्सिकोमध्ये पुरानंतर ७.१ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

Major Earthquake Mexico: मेक्सिकोमध्ये पुरानंतर ७.१ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

मेक्सिकोमध्ये आज, बुधवारी सकाळी भूकंपाचा जोरदार धक्के (Major Earthquake Mexico) बसले. भूकंपाचे झटके ६.९ तीव्रतेचे होते. परंतु त्यानंतर नॅशनल सिस्मॉलॉजिकल सर्व्हिसने मेक्सिकोच्या प्रशांत किनाऱ्यावरील भूकंप ७.१ रिश्टचा असल्याचे सांगितले. भूकंपापूर्वी हिडाग्लो राज्यातील तुला शहरामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज पुन्हा मेक्सिकोवर भूकंपाचे संकट ओढावले.

पहिल्यांदा म्हटले गेले की मेक्सिकोच्या प्रशांत किनाऱ्याजवळ ६.९ तीव्रतेचा जोरदार भूकंप आला. परंतु त्यानंतर ७.१ रिश्टचा भूकंप आल्याचे अपडेट दिली. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सर्व्हिसने सांगितले की, जेव्हा भूकंप आला तेव्हा राजधानीमध्ये शेकडो किलोमीटर दूर इमारती हादरल्या. यामुळे लोकं घाबरून आपल्या घरापासून बाहेर पडले.

दरम्यान भूकंपाचे केंद्रबिंदू रिसॉर्ट शहरापासून दूर ४८ किलोमीटर (३० मैल) अंतरावर असलेल्या गुएरेरो राज्यातील पुएब्लो मॅडेरोच्या ८ किलोमीटर (५ मैल) पूर्व केंद्रस्थानी होते. भूकंप झाल्यानंतर रहिवाशी आणि पर्यटकांना रस्त्यावर पाठवण्यात आले.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला की, भूकंपामुळे अकापुल्कोमध्ये अनेक इमारतीचे नुकसान झाले आहे. मेक्सिको सिटीच्या मेयर क्लाउडिया शिनबाम म्हणाले की, राजधानीमध्ये कोणतेही गंभीर नुकसान झाल्याची बातमी समोर आली नाही आहे. तसेच दुसऱ्या प्रत्यक्षदर्शी म्हणाला की, मेक्सिकोच्या बाजूचे शहर रोमा सुरमध्ये वीज गेल्यामुळे लोकं घाबरून घरातून बाहेर आले आहेत.

पुरामुळे १७ जणांचा मृत्यू

मेक्सिकोच्या हिडाल्गो राज्याच्या तुला शहरमध्ये मुसळधार पावसानंतर एका नदीला पूर आला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, अचानक पूर आल्यामुळे वीज गेली आणि ऑक्सिजन थेरेपीवर परिणाम झाला. यामुळे सेंट्रल मेक्सिकोच्या एका रुग्णालयात कमीत कमी १७ जणांचा मृत्यू झाला. तर ५६ लोकांचा दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.


हेही वाचा – इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण अग्नितांडव! आतापर्यंत ४० लोकांचा होरपळून मृत्यू


First Published on: September 8, 2021 1:17 PM
Exit mobile version