पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी नदीत अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुधवारी रात्री पश्चिम बंगालमधील जलपायगुडी येथील माल नदीत ही दुर्घटना घडली. या घटनेत अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळते. याशिवाय अनेक जण अजूनही नदीत अडकले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली. तसेच, त्यांनी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य केल्याचे समजते. (7 dead in flash flood accident during durga visarjan in west bengal jalpaiguri mal river)

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथे दुर्गा मूर्ती विसर्जनावेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढ झाली. त्यामुळे जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहून गेली. लोकल वाहून जात असल्याचे दिसताच, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाने विसर्जनाचा कार्यक्रम थांबवून लोकांच्या बचावकार्यास सुरुवात केली. या अपघातात 7 जणांचे मृतदेह सापडले असून 10 जखमींना वाचवण्यात यश आले आहे.

या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अपघाताची माहिती पोलिस व प्रशासनाला मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफचे जवान मदत आणि बचावकार्य करत आहेत. पथकाने रात्री उशिरापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले होते.


हेही वाचा – … होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका

First Published on: October 6, 2022 8:03 AM
Exit mobile version