ट्रक मिठाईच्या दुकानात घुसला, १६ जणांना चिरडले, संतप्त जमावाने पोलिस स्टेशन पेटवले

ट्रक मिठाईच्या दुकानात घुसला, १६ जणांना चिरडले, संतप्त जमावाने पोलिस स्टेशन पेटवले

ट्रक मिठाईच्या दुकानात घुसला, १६ जणांना चिरडले, संतप्त जमावाने पोलिस स्टेशन पेटवले

बिहारच्या नालंदा एका मिठाईच्या दुकानात ट्रक घुसल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ट्रकने एकूण १६ जणांना चिरडले आहे, तर यातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील १२ पेक्षा अधिक जणांना गंभीर दुखापत झाली आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील तेल्हाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ताडपर या गावात ही घटना घडली आहे.

या अपघातातनंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना सुरक्षित बाहेर काढले. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर शेकडो संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. या संतप्त नारिकांनी तेल्हाडा पोलिस स्थानकाला घेराव घालत पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना पोलीस स्थानकाबाहेर पडणेही अवघड झाले होते. या शेकडोच्या जमावाने पोलिस स्थानकाबाहेरील मोठ्या प्रमाणात वाहने पेटवून दिली. या आगीत इस्लामपूर पोलीस स्टेशनचा एक वाहन, अग्निशमन दलाचे एक वाहन, पोलीस स्टेशनचा जनरेटर, तीन दुचाकी, एक जप्त केलेला ऑटोसहीत 8 वाहने जळून खाक झाली आहेत.

त्याचबरोबर पोलिस स्थानकही पेटवण्याचा प्रयत्न केला. जखमींना घेवून जाणाऱ्या वाहनांवरही नागरिकांनी दगडफेक केली. दरम्यान हजारोंच्या संख्येत जमलेल्या संतप्त लोकांनी पोलीस स्थानकावरच हल्ला चढवला आहे. यातील काही नागरिकांनी पोलिसांची रिव्हॉल्वरही हिसवकावून घेतली. चपण कालांतराने काही गावकऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर ही बंदुक परत करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले. तसेच पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

या घटनेनंतर मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या आदेशानुसार मृतांच्या कुटूंबियांना जिल्हाधिकाऱ्यांनी 44 लाखाचा धनादेश सूपुर्द केला आहे. तर नालंदाचे खासदार कौशलेंद्र कुमार यांनी दुःख व्यक्त केले आहे.


 

First Published on: March 29, 2021 11:08 AM
Exit mobile version