सुलतानपूरमध्ये ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

सुलतानपूरमध्ये ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुरूग्राममधील सुलतानपूरमध्ये देखील ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, नराधमानं या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ देखील आपल्या मोबाईल फोनमध्ये शूट केला आहे. ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानं गुरूग्राममध्ये खळबळ उडाली आहे. आठवड्यापूर्वी ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एक बलात्काराची घटना समोर आली आहे. बलात्कार करणाऱ्या नराधमाची ओळख पटली असून त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम शेजारीच असणाऱ्या मैदानामध्ये मागील सहा महिन्यांपासून सुरक्षा रक्षकाचं काम करत आहे.

घराबाहेर मुलगी खेळत असल्याचा फायदा घेत नराधम जितेंदरनं संधी साधली. त्यानंतर त्यानं मुलीला तिच्याच घरामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित मुलीचा व्हिडीओ देखील शूट केला. पीडित मुलीन नराधम जितेंदरची ओळख पटवली असून पीडितेनं दिलेल्या जबानीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचे वडील हे बांधकाम कामगार असून तिची आई गृहिणी आहे.

वाचा – ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या?

First Published on: November 19, 2018 12:06 PM
Exit mobile version