तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर कोरोना लसीकरणात झाली ८० टक्के घट

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर कोरोना लसीकरणात झाली ८० टक्के घट

लसीकरण

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याने देशाची सर्व गणितं अतिशय वेगाने बदल्याचे दिसून आले आहेत. तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर पहिल्या आठवड्यात अफगाणिस्तानमध्ये कोरोना लसीकरण तब्बल ८० टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची युनिसेफने चेतावणी देखील आहे. ते म्हणाले आतापर्यंत देशाला दिलेल्या कोरोना डोसची एक्सपायरी डेट संपण्याच्या मार्गावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने २० वर्षांच्या युद्धानंतर आपले लष्करी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तालिबानने देशात हिंसाचार सुरू केला. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबीज केली. त्यामुळे तेथे वास्तव्य करणारे नागरिक भीती आणि असहायतेच्या छायेच आपले जीवन जगत आहेत.

रॉयटर्सला युनिसेफच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या ताब्यात आल्यापासून कोरोना लसीकरण मोहीम ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन लसीचे साधारण २ मिलियन डोस अफगाणिस्तानला वितरित केले गेले आहे, ज्यांची एक्सपायरी डेट नोव्हेंबरमध्ये संपत आहे. युनिसेफच्या प्रवक्त्याने लसीकरणात झालेली घट ही तालिबानच्या कारणामुळे झाली आहे का? या प्रश्नावर उत्तर देण्यास नकार दिला. परंतु लसीकरण मोहिमेच्या कमी झालेल्या वेगामुळे होणाऱ्या धोक्यांविषयी इशारा देखील दिला आहे. तर, यूएन एजन्सीने महिलांसह सर्व अफगाणिस्तानच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे.

१५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात देशातील ३४ प्रांतांपैकी २३ प्रांतांमध्ये ३० हजार ५०० लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले, त्या तुलनेत गेल्या आठवड्यात ३० प्रांतांत १ लाख ३४ हजार ६०० एवढे होते, अशी माहिती युनिसेफने दिली. यासह डब्ल्यूएचओने दिलेल्या आकडेवारीनुसार, २० ऑगस्टपर्यंत, ४० मिलियन लोकसंख्या असलेल्या अफगाणिस्तानमध्ये केवळ १.२ मिलियन डोस देण्यात आले आहे.


नारायण राणेंच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात, आशिष शेलारांकडून सीबीआय चौकशीची मागणी

First Published on: August 25, 2021 9:06 PM
Exit mobile version