CoronaVirus: ६ दिवस १९६ किमी चालल्यानंतर गरोदर महिलेला मिळाली मदत!

CoronaVirus: ६ दिवस १९६ किमी चालल्यानंतर गरोदर महिलेला मिळाली मदत!

CoronaVirus: ६ दिवस १९६ किमी चालत गेल्यानंतर गरोदर महिलेला मिळाली मदत!

जगभरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असतांना कोरोना या आजाराचे गांभिर्य लक्षात घेऊन घरी सुरक्षित रहा, असे सांगण्यात येत आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना तसेच जे आपल्या घरापासून दूर आहेत, त्यांना घरी जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असाच एक प्रकार राजस्थानात असलेल्या डुंगरपूर येथील टामटिया गावात बघायला मिळाला.


ज्या मुलावर ३ वर्षापुर्वी केले अंत्यसंस्कार, लॉकडाऊनमध्ये आला अचानक घरी! आणि…

लॉकडाऊन दरम्यान प्रवास करण्यास कोणतेही साधन नसताना ९ महिन्यांच्या गरोदर महिलेने ६ दिवसांत तब्बल १९६ किमीचा प्रवास चालत केला. यावेळी तिच्यासोबत पती आणि दोन मुलेही होते. ही पायपीट करताना तिच्या समोर अनेक प्रशासनातील लोकं तसेच पोलिसांच्या चौक्या देखील गेल्या, मात्र अशा खडतर वेळी देखील तिच्या मदतीला कोणी आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

१९६ किमी चालल्यानंतर मिळाला दिलासा

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील सैलाना या तालुक्यामधील कुपडा गावातील रहिवासी लक्ष्मण भाबर, सोबत ९ महिन्यांची गरोदर पत्नी बापुडी, २ वर्षांची मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा अहमदाबादहून ६ दिवसांपूर्वी पायी प्रवास करत निघाले होते. ते रतनपूर सीमेवरून डुंगरपूर मार्गे टामटिया चेक पोस्टजवळ पोहोचले. यावेळी येथे आपले कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर रुग्णवाहिकेची सोय करून या महिलेला सुखरूप घरी पोहोचवण्यात आले.

First Published on: May 13, 2020 11:54 PM
Exit mobile version