घरदेश-विदेशज्या मुलावर ३ वर्षापुर्वी केले अंत्यसंस्कार, लॉकडाऊनमध्ये आला अचानक घरी! आणि...

ज्या मुलावर ३ वर्षापुर्वी केले अंत्यसंस्कार, लॉकडाऊनमध्ये आला अचानक घरी! आणि…

Subscribe

मध्य प्रदेशातील छतरपूर येथे कोरोना दरम्यान एका कुटुंबातील 'मृत मुलगा' आपल्या घरी जिवंत परतल्याचे समोर आले आहे .

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनामुळे सगळे लोकं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करताय. तर काही लोकांचा कोरोनामुळे बळी देखील जात आहे. मात्र मध्यप्रदेशात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर येथे कोरोना दरम्यान एका कुटुंबातील ‘मृत मुलगा’ आपल्या घरी जिवंत परतल्याचे समोर आले आहे .

छतरपूरच्या बिजावर भागात तीन वर्षांपूर्वी बिजावरमधील मौनासैय्या जंगलात हाडांचा सापळा सापडला होता. तेथील आदिवासींनी त्यांचा मुलगा म्हणून त्याची ओळख पटवून दिली होती. मात्र कुटुंबानेही त्यांच्या मुलासारख्या दिसणाऱ्या सांगाड्याचे अंत्यसंस्कार केले होते. कोरोना संकटामुळे बऱ्याच राज्यांतील मजूर आपल्या घरी परतत आहेत, अशावेळी हा मुलगा डिलारी गावात आपल्या घरी अचानक पोहोचला तेव्हा लोक त्याला बघून हैराण झाले. आपल्या मुलाचा मृत्यू झाला असे समजून वडिलांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते तो अचानक जिवंत समोर येऊन उभा राहिला.

- Advertisement -

मुलाच्या वडिलांना या मुलाला घेऊन जाऊन पोलिसांना सर्व घडलेली घटना सांगितली. सांगितलेल्या प्रकारावरून पोलिसांनाही याचा धक्का बसला. तीन वर्षांपूर्वी हा मुलगा आपल्या कुटुंबाचा राग घेऊन हरियाणाच्या गुरुग्राममध्ये निघून गेला आणि तेथील कारखान्यात काम करत राहिला. मात्र लॉकडाऊनदरम्यान तो घरी परतला.

या प्रकरणात, बिजावर पोलिसांनी असे सांगितले की, ज्या मुलाचा मृत्यू झाला असे समजले जात होते, वास्तविक तो मुलगा जिवंत आहे. मात्र त्यांच्या सारखा दिसणाऱ्या व्यक्तीच्या हाडांचा सापळा जंगलात सापडल्याने त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले होते. असे असताना देखील या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात येईल.


शाकाहारींना कोरोना होऊ शकत नाही? वाचा सत्य परिस्थिती!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -