सर्वोच्च न्यायालयात एतिहासिक दिन, एकाचवेळी ९ न्यायमूर्तींचा शपथविधी

सर्वोच्च न्यायालयात एतिहासिक दिन, एकाचवेळी ९ न्यायमूर्तींचा शपथविधी

सर्वोच्च न्यायाधीशांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांचा शपथविधी

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून देशातील विविध राज्यातील नऊ न्यायमूर्तींनी आज एकाचवेळी शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदावर एकाचवेळी ९ जणांनी शपथ घेण्याचा हा एक एतिहासिक प्रसंग म्हणून नोंद झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती ए एस ओक, जे के माहेश्वरी, हिमा कोहली, बी व्ही नागरत्ना, सी टी रविकुमार, एम एम सुद्रेंश, बेला एम त्रिवेदी, पी एस नरसिंहा यांनी सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या कार्यक्रमात शपथ घेतली. शपथ घेतलेल्या न्यायमूर्तींमध्ये तीन न्यायमूर्ती या महिला न्यायमूर्ती आहेत. (9 new Supreme Court judges, including 3 women, took oath as sc judge)

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या उपस्थितीत या नऊ जणांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. यापैकी तीन न्यायमूर्ती हे आगामी काळात सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांचा समावेश आहे. आजच्या नव्या ९ जणांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही ३३ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील कमाल न्यायाधीशांची संख्या ही ३४ इतकी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी ९ न्यायमूर्ती शपथ घेण्याची हा प्रसंग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऑडिटोरिअममध्ये कोरोनाच्या निर्बंधांमुळे मर्यादित स्वरूपाचा हा कार्यक्रम पार पडत आहे. पारंपारिक पद्धतीने आतापर्यंत सरन्यायाधीशांच्या कोर्टरूममध्ये शपथविधी होण्याची परंपरा आहे. पण कोरोनामुळे यंदा ऑडिटोरिअममध्ये हा शपथविधी पार पडला.

देशाच्या राष्ट्रपतींनी गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी ९ न्यायूमर्तींच्या नावांवर शिक्कमोर्तब केले. त्यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही ९ नावे सुचवली होती. त्यानंतर केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतरच या नावांवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले. त्यामध्ये न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न या कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचाही समावेश आहे. त्यांच्याकडे भारतातील पहिल्या सर न्यायाधीश म्हणून पाहिले जात आहे. त्यासोबतच पीएस नरसिंह हेदेखील सरन्यायाधीश पदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनाही सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली आहे. याआधी एसएम सिकरी यांना सर्वोच्च न्यायालयात सर्वात १९६४ मध्ये बढती मिळाली होती. त्यांना १९७१ साली सरन्यायाधीश हे पद मिळाले. न्यायमूर्ती यु ललित यांना वकील पदापासून थेट सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश अशी बढती मिळाली होती. सध्याचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे निवृत्त झाल्यानंतर ललित यांचीही सरन्यायाधीश पदावर वर्णी लागू शकते.

कोण आहेत सर्वोच्च न्यायालयातील ९ न्यायमूर्ती

या नऊ न्यायमूर्तींच्या यादीत मुळचे महाराष्ट्राचे आणि सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए एस ओक यांचा समावेश आहे. त्यासोबतच गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ, सिक्कीमचे मुख्य न्यायाधीस जे के माहेश्वरी, तेलंगणाचे मुख्य न्यायाधीश हेमा कोहली, कर्नाटकचे न्यायाधीश बी व्ही नागार्थना, केरळचे न्यायमूर्ती सी टी रविकुमार, मद्रास कोर्टाचे न्यायमूर्ती एम एम सुंद्रेश, गुजरातचे न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, वरिष्ठ न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांचा समावेश आहे.


हे ही वाचा – ..तर पहिल्यांदाच महिला न्यायमूर्ती विराजमान होतील


 

First Published on: August 31, 2021 11:28 AM
Exit mobile version