नीरव मोदीला ९ जुलैपर्यंत कोठडी; ब्रिटन न्यायालयाचा निर्णय

नीरव मोदीला ९ जुलैपर्यंत कोठडी; ब्रिटन न्यायालयाचा निर्णय

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी हिरा व्यापारी नीरव मोदी याला गुरुवारी ९ जुलैपर्यंत ब्रिटनच्या न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केल्यापासून तो दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात आहे. लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणीसाठी तो व्हिडिओ लिंकद्वारे उपस्थित झाला. भारताने ब्रिटनला ४९ वर्षीय नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली आहे.

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत पुढील सुनावणी ७ सप्टेंबरला होईल, असं जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गूजी सांगितलं. केवळ नाव आणि राष्ट्रीयत्व सुनिश्चित करण्यासाठी नीरव मोदीला बोलण्याची संधी दिली गेली. गेल्या महिन्यात प्रत्यार्पण सुनावणीचा पहिला भाग झाला. सुनावणीचा दुसरा भाग ७ सप्टेंबरपासून ठरविण्यात आला आहे. ही सुनावणी पाच दिवस चालणार आहे.


हेही वाचा – ऑनलाईन शिक्षणासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी


दरम्यान, ईडीने नीरव आणि मेहुलविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल केला आहे. दोन्ही व्यावसायिकांनी पंजाब नॅशनल बँकेचा सुमारे १४ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यानंतर दोन्ही व्यावसायिकांनी भारतातून पळ काढला. नीरव मोदीने मार्च २०१९ रोजी लंडनमध्ये ब्रिटिश पोलिसांनी अटक केली होती आणि सध्या तिथल्या तुरूंगात जेरबंद करण्यात आलं आहे. त्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणांच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू आहे तर मेहुल चोक्सी फरार आहे. तो आफ्रिकेतील अँटिगामध्ये असल्याचं समजतंय.

 

First Published on: June 12, 2020 9:07 AM
Exit mobile version