मध्य प्रदेशात मजुरांना गावी घेऊन जाणारी बस उलटली, १५ जणांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशात मजुरांना गावी घेऊन जाणारी बस उलटली, १५ जणांचा जागीच मृत्यू

प्रातिनिधक छायाचित्र

 भोपाळ – मध्य प्रदेश राज्यातील रीवाजवळ राष्ट्रीय महामार्ग-30 वर शुक्रवारी रात्री भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासकार्य सुरू केले आहे. उत्तर प्रदेशची ही बस असून ती हैदराबादहून गोरखपूरला जात होती. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींसाठी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

दिवाळीनिमित्त गावी जाणारी मजुरांची ही बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. रेवा येथील सुहागी टेकडीजवळ शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही बस ट्रॉलीला धडकली. ट्रॉलीच्या धडकेमुळे बस उलटली. बसच्या अपघातात १४ जणांनी आपला जीव गमावला असून ४० जण जखमी झाले आहेत. तर, केबिनमध्येही काही प्रवासी अडकले होते. त्यांना बचावकार्यावेळी बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी २० जणांना प्रयागराज येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.


बसमध्ये ८० हून अधिक प्रवासी होते

बसमध्ये ८० हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस सोहागी डोंगराजवळ येताच बसच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे बसचालक गोंधळला. बस अनियंत्रित होऊन ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन उलटली. ट्रकला धडकलेल्या वाहनाचा चालक वाहनासह घटनास्थळावरून बेपत्ता आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

First Published on: October 22, 2022 8:51 AM
Exit mobile version