दुचाकीस्वारासोबतच्या वादानंतर कार चालकाने अनेकांच्या अंगावर घातली गाडी; आरोपी अटकेत

दुचाकीस्वारासोबतच्या वादानंतर कार चालकाने अनेकांच्या अंगावर घातली गाडी; आरोपी अटकेत

एका कार चालकाने दुचाकीस्वारासोबत झालेल्या वादानंतर अनेकांच्या अंगावर गाडी नेल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीच्या अलीपुरमध्ये ही धक्कदायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपास करत आरोपी कार चालकाला अटक केली आहे. (A car ran over people in Alipur area of Delhi)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या अलीपुर परिसरात दुचाकीस्वार आणि कार चालकाचा काही कारणात्सव वाद झाला. या वादानंतर कार चालकाला राग अनावर झाला अन् त्याने तेथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या अंगावर गाडी घातली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी कार चालकाचा तपास सुरू केला. त्यानंतर नितीन मान कार चालकाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, 26 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून छोट्या वादानंतर राग अनावर झाल्याने कार चालक अथवा दुचाकीस्वाराने गाडी संबंधीताच्या अंगावर घातल्याच्या घटना घडत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असून, अनेक आरोपींना अटकही केल्याची माहिती मिळते.


हेही वाचा – शिंदे -फडणवीस सरकार गुजरातचे एजंट; उद्योग धंद्यापाठोपाठ मुंबईही…; नाना पटोलेंचा घणाघात

First Published on: October 28, 2022 4:38 PM
Exit mobile version