PFI कारवाईचे पुण्यात पडसाद; आंदोलकांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

PFI कारवाईचे पुण्यात पडसाद; आंदोलकांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

एनआयए आणि ईडीने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित कार्यकर्ते आणि संपत्तीवर छापेमारी केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या या छापेमारीविरोधात केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात पडसाद उमटले. एनआयए आणि ईडीने पीएफआय संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केली. पुण्यातही PFI कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. धक्कादायक म्हणजे आक्रमक आंदोलनकर्त्यांकजून यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यच्या कोंढवा खुर्दमधील शिवनेरी नगरमधील रिजाज जैनुद्दीन सय्यद ( वय 26) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 141, 143, 145, 147, 149, 188, 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीरपणे जमाव जमवून आंदोलन केले, NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआयच्या राज्यस्तरीय नेत्यांवर कारवाई करत अटक केली. याच निषेधार्थ आरोपींनी मोठ्यामोठ्याने घोषणा देत रस्ता रोको केला. यावेळी पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरची घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत रस्त्यावरील वाहनांना अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता बंडरागार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.


केरळमध्ये पीएफआय छापेमारीविरोधातील बंदची हाक; अनेक भागात हिंसाचार, जाळपोळ

First Published on: September 24, 2022 2:14 PM
Exit mobile version