गंगूबाईमधील ‘तो’ सीन पाकिस्तानमध्ये जाहिरात म्हणून वापरला; नेटीझन्स संतापले

गंगूबाईमधील ‘तो’ सीन पाकिस्तानमध्ये जाहिरात म्हणून वापरला; नेटीझन्स संतापले

गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट तुफान गाजला होता. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. यातील मुख्य अभिनेत्री आलिया भट हिच्या कामाचं तर सगळ्यांनीच खूप कौतुक केलं. अभिनय, दिग्दर्शन, नृत्य, नेपथ्य या साऱ्या स्तरावर उत्कृष्ट ठरलेला हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण या चित्रपटातील एका सीनचा वापर करून पाकिस्तानातील एका रेस्तराँची जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (A scene n from Gangubai Kathiyawadi bollywood movie shown as advertisement in pakistan)

हेही वाचा – नेहा कामतचा मालिकेत नवा लुक, व्हिडिओ पोस्ट करताच सोशल मीडियावर चर्चा

या चित्रपटातील एक सीन ज्या गंगूबाई आपल्या ग्राहकांना बोलवत असते. याच सीनचा वापर रेस्तराँच्या जाहिरातीसाठी करण्यात आलाय. रेस्तराँने आलियाच्या या सीनचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रेस्तराँने खास पुरुषांसाठी ऑफर ठेवली असल्याचं भलं मोठं पोस्टर दिसत आहे. तसेच त्यांनी यासाठी एक टॅगलाईन देखील तयार केली आहे.

ही जाहिरात करताना त्यांनी काही शब्दांचाही वापर केलाय. त्यामुळे अनेक नेटीझन्सने त्यांच्यावर टीका केला आहे. “आजा ना राजा…अजून कशासाठी वाट पाहतो?” अशी ही टॅगलाईन वापरत त्यांनी ही जाहिती केली आहे.


हेही वाचा – शक्तिमान येतोय मोठ्या पडद्यावर, भारताच्या या सुपरहिरोसाठी तब्बल ३०० कोटींचा खर्च

रेस्तराँमध्ये येणाऱ्या पुरुषांना २५ टक्के ऑफ देण्यात आलीय. मेन्स मंडे अंतर्गचत ही ऑफर देण्यात आली असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेटीझन्सने या जाहिरातीवर आक्षेप घेतल्यावर अगदी रेस्तराँच्या मालकाने पुन्हा आपली बाजू मांडली आहे. यावेळी ते म्हणाले की, “कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. ही फक्त एक कल्पना आहे. ही पोस्ट एका संकल्पनेवर आधारित आहे. आम्ही पूर्वीसारखंच प्रेमाने तुमची सेवा करण्यास हजर आहोत. मुव्ही करे तो आग रेस्तराँ करे तो पाप” सोशल मीडियावर या रेस्तॉंरविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: June 18, 2022 5:02 PM
Exit mobile version