घरमतप्रवाहशक्तिमान येतोय मोठ्या पडद्यावर, भारताच्या या सुपरहिरोसाठी तब्बल ३०० कोटींचा खर्च

शक्तिमान येतोय मोठ्या पडद्यावर, भारताच्या या सुपरहिरोसाठी तब्बल ३०० कोटींचा खर्च

Subscribe

भारताच्या शक्तिमानची कथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात पाहायला मिळणार आहे. तब्बल ३०० कोटी एवढा खर्च या चित्रपटासाठी करण्यात येणार आहे.

मनोरंजन विश्वात नेहमीच काही न काही इंटरेस्टिंग घडामोडी घडत असतात. पण ही बातमी वाचताना तुम्हालाही आनंद होईल. नव्वदीच्या दशकात ‘शक्तिमान’ (shaktimaan) या मालिकेने सर्वांना वेड लावले होते. शक्तिमान ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. नव्वदीच्या काळात शक्तिमान ही मालिका न पाहिलेला प्रेक्षक विरळाच असेल. पण याच शक्तिमानची ही जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. पण यावेळी शक्तिमान मोठ्या पडद्यावर एन्ट्री करत प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करणार आहे. या चित्रपटात अभिनेते मुकेश खन्ना (mukesh khanna) शक्तिमान ही भूमिका साकारणार आहेत. त्याच बरोबर या चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

शक्तिमान (shaktimaan) ही मालिका जेवढी लोकप्रिय झाली तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर अभिनेते मुकेश खन्ना ज्यांनी शक्तिमान ही भूमिका साकारली त्यांना सुद्धा तेवढीच लोकप्रियता मिळाली. मुकेश खन्ना यांनी नुकतीच एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटा विषयी काही गोष्टी सांगितल्या. ‘हा चित्रपट माझ्याकडे अनेक वर्षांनी आला आहे. बरेच लोक मला नेहमी म्हणायचे, की शक्तिमनाचा दुसरा सिझन यायला पाहिजे. पण यावेळी मला शक्तिमान छोट्या पडद्यावर नाही तर चित्रपटामध्ये हवा होता’. असं अभिनेते मुकेश खन्ना (mukesh khanna) यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं. याच चित्रपटासंदर्भात बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, की सोनी पिक्चर्स सोबत मी हा चित्रपट हरणार आहे. त्यांनी देखील य चित्रपटासंदर्भात सांगितले की हा एक बिग बजेट चित्रपटर असणार आहे. या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी रुपये एवढे असणार आहे. या बिग बजेट चित्रपटात बऱ्याच नवीन गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

- Advertisement -

या चित्रपटाच्या कथेसंदर्भातही मुकेश खन्ना (mukesh khanna) मोकळेपणाने बोलत होते. ‘ या चित्रपटाची कथा मी माझ्या प्रमाणेच तयार करून घेतली आहे. त्याच बरोबर ‘शक्तिमान’च्या (shaktimaan) कथेत कोणताच बदल नको अशी अट मी ठेवली होती असंही मुकेश खन्ना यांनी सांगितले. त्याचबरोबर चित्रपटात ‘शक्तिमान’ कोण असणार असा प्रश्न मुकेश खन्ना यांना विचारल्यावर ते म्हणले, ‘जर दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याने जर शक्तिमानाची भूमिका साकारली तर देश त्याचा स्वीकार करणार नाही’ मात्र या चित्रपटासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट मोठया पडद्यावर पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल असंही मुकेश खन्ना यांनी सांगितले. शक्तिमान या मालिकेची भुरळ आणि प्रेक्षकांवर आहे. आणि आता या चित्रपटाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

- Advertisement -

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -