प्रेमविवाह करणाऱ्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

प्रेमविवाह करणाऱ्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई | प्रेमविवाह (Love Marriage) केलेल्या दाम्पत्यांमध्ये घटस्फोटाचे (Divorce) प्रमाण सर्वाधिक आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायामूर्तींनी (Supreme Court) एका घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी करताना केली आहे. भारतात लग्नसंस्थेला ही फार मोठा महत्त्व आहे. एका दाम्पत्यामध्ये सुरू असलेल्या वादाशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली आहे.

या सुनावणीदरम्यान दाम्पत्याने प्रेमविवाह असल्याचे न्यायालयात सांगितले. यावेळी न्यायामूर्ती भूषण गवाई म्हणाले, प्रेमविवाह केलेल्यांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाद सुरू असलेल्या दाम्पत्याला ध्यान किंवा मेडिटेशन करण्याचा सल्ला न्यायालयाने दिला होता. परंतु, याला पतीने विरोध केला होता. या दाम्पत्यांना विवाह टिकविण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही न्यायालयाने दिला होता. परंतु, या दाम्पत्यांना घटस्फोटच हवा होता. यामुळे न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.

या घटस्फोटात न्यायालयाने मध्यस्थी करण्याचा पर्याय सुचविला होता. परंतु, पतीला न्यायालयाचा हा पर्याय मान्य नव्हता. यापूर्वी न्यायालयाने एका निकालाच्या पृष्ठभूमीवर पतीच्या परवागनीशिवाय घटस्फोट दिला जाऊ शकतो, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. विवाहित जोडपे घटस्फोटापर्यंत का येतात. या मागच्या कारणांचा आपण विचार करायला हवा. यात प्रेम विवाह करणारे नवरा आणि बायको हे एकमेकांवर त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांवर करीत असलेल्या गंभीर आरोपांचाही समावेश आहे. तसेच दाम्पत्यांमध्ये वाद किंवा भांडणे झाल्यानंतर पती आणि पत्नी यावर तोडगा काढण्यासाठी कितीवेळ प्रयत्न केला, यांच्या व्यक्तिगत नात्यावर काय परिणाम झाला, हे विचारात घ्यायला हवे, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले आहे.

 

First Published on: May 18, 2023 2:54 PM
Exit mobile version