‘जय श्री राम’च्या घोषणेला नकार देणाऱ्या शिक्षकाला रेल्वे बाहेर फेकले

‘जय श्री राम’च्या घोषणेला नकार देणाऱ्या शिक्षकाला रेल्वे बाहेर फेकले

प्रातिनिधिक फोटो

‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या नाही म्हणून एका शिक्षकाला धावत्या रेल्वेमधून बाहेर ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम बंगालयेथील धाकुरीया आणि पार्क सर्कसच्या दरम्यान गुरुवारी दुपारी घडली आहे. सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. परंतु पश्चिम बंगाल येथील वादाचा फटका इतर लोकांना बसत आहे. बंगालमध्ये या आधीही अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. एवढच नव्हे तर, भाजप आणि तृणामूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील वाद अधिकच पेटताना दिसत आहे. या प्रकरणातील आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

हाफिझ मोहम्मद हल्दर (२६) असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. दक्षिण २४ परगणामध्ये बसंती येथे हाफिझ राहतात. हाफिझ हे मदरशामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हाफिझ गुरुवारी दुपारी दक्षिण २४ परगणा येथून हुगळीला चालले असताना रेल्वे प्रवासात त्याच्यासोबत ही घटना घडली. हाफिझ हे हुगळीला जात असताना रेल्वेच्या डब्यामध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा देत होते. त्यांच्या गटातील काहीजणांनी हाफिझ यांना घोषणा द्यायला सांगितले. परंतु हाफिझने स्पष्ट नकार दिला. त्यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या लोकांनी हाफिझला मारहार करायला सुरुवात केली. रेल्वेमध्ये असलेल्या इतर लोकांनी हाफिझ मदत न करता केवळ पाहत होते, असे हाफिझ यांनी सांगितले. त्यानंतर रेल्वे सर्कस स्टेशनवर असताना त्यांनी हाफिझला रेल्वेतून बाहेर ढकलून दिले. सुदैवाने हाफिझला यामध्ये गंभीर जखम झाली नाही. हाफिझला किरकोळ मार लागला असून जवळील चित्ररंजन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु या घटनेतील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही असे, रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.

First Published on: June 25, 2019 10:02 AM
Exit mobile version