करोना वरची कविता तुम्ही वाचली का?

करोना वरची कविता तुम्ही वाचली का?

काँग्रेसचे नेते आणि साहित्यिक शशी थरूर यांनी करोनाबाबत लिहिलेली कविता चांगलीच व्हायरल होत आहे.

चीनमधून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसने हजारो बळी घेतले. करोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी शासनातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. काय करावे, काय करू नये याबाबत अनेक ठिकाणी जाहिराती, पोस्टर्स लावून करोनाबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे. मात्र काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी आपल्या खास शैलीत करोनापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक कविता रचून करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुण्याचे महत्व सांगितले आहे. थरूर यांनी आपल्या ट्विटरवरून ही कविता पोस्ट केली असून ‘भाई मेरे…हाथ साबुन से धोना’ असे या कवितेचे शीर्षक आहे. ही लघुकविता ट्विटरवर चांगलीच व्हायरल होत आहे.

वाचा शशी थरूर यांची कविता 

Corona Corona का डर खा रहा है

ये लफ्ज़ अब हमारा भी सर खा रहा है

किसी, चीनी ने खाया है गलती से कुछवो कुछ

अब, नारी और नर खा रहा है

घरेलू से नुस्खे बताते हैं सब

किस-किस की मानें, बता मेरे रब?

भगाना है गर हमको दानव घिनोना

भाई मेरे…हाथ साबुन से धोना  

हे मंत्रीही झाले होते व्हायरल

करोनाबाबत जगभरात वैद्यकीय मदत, स्वछता, हॉस्पिट्लसची उभारणी असे अनेक प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मात्र आपल्याच स्टाईलने ‘करोना गो’ म्हणत या आजाराला भारतातून निघून जाण्यास सांगतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता पुन्हा आठवलेंनी करोना सारख्या जीवघेण्या आजाराला ‘चमकता तारा’ असे म्हटले आहे. त्यामुळे आता सोशल मीडियात पुन्हा त्यांच्यावर प्रचंड टीका होताना दिसतेय.

First Published on: March 14, 2020 7:15 PM
Exit mobile version