आधार कार्ड हरवल्यानंतर घरबसल्या अशा पद्धतीने करा अर्ज

आधार कार्ड हरवल्यानंतर घरबसल्या अशा पद्धतीने करा अर्ज

सध्या आधार कार्ड हे एक महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक झाले आहे. ते आपल्याला रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि अन्य काही महत्वाच्या कागदपत्रांसोबत लिंक करणे अनिवार्य आहे. थोडक्यात असे म्हणू शकतो की, याशिवाय कोणते काम होणे शक्य नाही. परंतु जर तुमचे आधार कार्ड हरवले तर तुम्ही काय कराल? खरंतर तुमचे आधार कार्ड हरवल्यानंतर ते तुम्हाला पुन्हा काढता येते. सध्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ते तुम्हाला काढण्यासाठी अर्ज करणे सोप्पे झाले आहे. या व्यतिरिक्त तुमचे आधार कार्ड खराब झाले किंवा हरवले तर तुम्ही PVC आधार कार्ड मागवू शकता. पीवीसी म्हणजेच पॉलिविनाइल क्लोराइ़ड कार्ड्स प्रमाणे हे एक प्लास्टिक कार्ड असते. ज्यावर आधार कार्ड संबंधित माहिती असते.

नवे पीवीसी कार्ड बनवण्यासाठी केवळ तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावा लागणार आहे. पीवीसी आधार कार्ड सिक्युर क्युआर कोड, होलोमाग्राम, माइक्रो टेक्स्ट, कार्ड कधी दिले आणि प्रिंट कधी झाले याच्यासह अन्य सुद्धा माहिती त्यावर असते.

कसा कराल ऑनलाईन अर्ज?
-UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा
-My Aadhar सेक्शनमध्ये जाऊन Order Aadhar PVC Card वर क्लिक करा
-आपल्या आधार कार्डवरील १२ अंकी क्रमांक किंवा १६ डिजिट वर्च्युअल आयडी अथवा २८ डिजिटचा आधार एनरोलमेंट आयडी टाका
-त्यानंतर सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा भरा
-ओटीपीसाठी Send OTP वर क्लिक करा
-रजिस्टर्ड मोबाईलवर आलेल्या ओटीपीला निर्धारित
ठिकाणी भरा आणि सबमिट वर क्लिक करा
-सबमिट केल्यानंतर तुम्हाला आधार पीवीसी कार्डचा एक प्री-व्यु पहायला मिळेल
-त्यानंतर खाली दिल्या गेलेल्या पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा
-आता तु्म्हाला पेमेंट पेजवर नेले जाईल, येथे ५० रुपये शुल्क भरावा लागेल
-पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पीवीसी कार्डची ऑर्डर पूर्ण होईल
-स्पीड पोस्टच्या माध्यमातून युआयडीआय तुमचे आधार कार्ड घरी पाठवून देईल.

ऑफलाइन पद्धतीने सुद्धा तुम्ही ते तयार करु शकता. यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. येथे जाऊन तुम्ही नवे आधार कार्ड तयार करु शकता.

 


हेही वाचा: मराठी, कोंकणीसह १३ भाषेत होणार सीएपीएफची परीक्षा; केंद्र सरकारचा निर्णय

First Published on: April 15, 2023 4:37 PM
Exit mobile version