घरदेश-विदेशमराठी, कोंकणीसह १३ भाषेत होणार सीएपीएफची परीक्षा; केंद्र सरकारचा निर्णय

मराठी, कोंकणीसह १३ भाषेत होणार सीएपीएफची परीक्षा; केंद्र सरकारचा निर्णय

Subscribe

नवी दिल्लीः केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) कॉन्स्टेबल भरती परीक्षा मराठी, कोंकणीसह अन्य १३ भाषांमध्ये होणार आहे. ही परीक्षा आधी इंग्रजी आणि हिंदी भाषेत होत होती. स्थानिक तरुणांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे, प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देता यावे यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय नोकर भरती परीक्षा केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत होतात, यावर तामिळनाडू व तेलंगणा सरकारने आक्षेप घेतला होता. त्यामुळेच मोदी सरकारने सीएपीएफ कॉन्स्टेबल भरती परीक्षा १३ स्थानिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. नोकरी भरतीत स्थानिक तरुणांना संधी देण्याची व प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्याला अनुसरुनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना मातृभाषेत परीक्षा देता येणार आहे.

- Advertisement -

सीएपीएफच्या कॉन्स्टेबल पदाच्या ९२१२ रिक्त जागंसाठी ५७९ जणांनी तामिळनाडूतून अर्ज भरला होता. या परीक्षेतील २५ प्रश्न हे हिंदी भाषेतील होते. हिंदी भाषेतील प्रश्नांची उत्तरे केवळ हिंदी भाषिथ तरुणांनाच होणार आहे, असा आरोप तामिळनाडूतील उमेदवारांनी केला होता. तसेच तामिळनाडूतील कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते सिद्वारमैया यांनी प्रादेशिक भाषेत सीएपीएफची परीक्षा घेण्याची मागणी केली होती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीही सीएपीएफ भरती परीक्षा तामिळ भाषेत घेण्याचा मागणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती.

- Advertisement -

या भाषामध्ये होणार परीक्षा
आसाम, बंगाली, गुजराती. मराठी, मल्ल्याळम, कन्नड, तामिळ, तेलुगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपूर, कोंकणी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -