काँग्रेस व्हेंटिलेटरवर आहे – राघव चड्ढा

काँग्रेस व्हेंटिलेटरवर आहे – राघव चड्ढा

गेले आठवडाभर राजस्थानात सुरू असलेला सत्तासंघर्ष अद्याप सुरू आहे. आता आम आदमी पक्षाचे प्रवक्ता राघव चड्ढा यांनी काँग्रेस सध्या व्हेंटिलेटवर असून विरोधी पक्ष कोरोना संकटावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असताना घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राघव चड्ढा यांनी काँग्रेसचं भवितव्य अंघारात असून पक्ष आणि देशालाही ते उज्वल भविष्य देऊ शकत नाही. नवीन पिढीला संधी दिली पाहिजे असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

अनिल चौधरी यांनी ट्विटरच्या  माध्यमातून राघव चड्ढा यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “तुम्ही केजरीवाल यांना मत दिल्यास अमित शाह दिल्लीचं सरकार चालवण्यासाठी मिळतात. काँग्रेस अशी ऑफर देऊ शकत नाही”, असा टोला लगावला आहे.

राघव चड्ढा यांनी “एकीकडे आज कोरोनाचं सकंट असताना संपूर्ण देश राजकीय पक्ष एकत्र काम करतील अशी अपेक्षा करत असताना येथे एक राजकीय पक्ष आमदार विकत असून दुसरा पक्ष त्यांना खरेदी करत आहे” आरोप केला आहे. संपूर्ण देश राजस्थानमधील राजकीय नाट्य पाहत आहे. हे घाणेरडं राजकारण पाहून देशातील जनता दुखावली आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत राजकीय पक्षांचं घाणेरडं राजकारण पाहणं वेदनादायी आहे. काँग्रेस व्हेटिंलेटरवर असून वाचण्याची शक्यता फार कमी आहे, त्यामुळे आम आदमी पक्ष हा एकमेवर पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचं कोणतेही भविष्य नाही. त्यामुळे ते देशाला चांगलं भविष्य देऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष व्हेटिलेटरवर असून प्लाझ्मा किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही. काँग्रेस पक्षाचं वय झालं असून खाली कोसळला आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.  त्यामुळे आम आदमी पक्ष एकमेव पर्याय असल्याची खात्री झाली आहे,” असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.


हे ही वाचा – नागपूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, १२५ जणं क्वारंटाईन!


First Published on: July 17, 2020 10:38 AM
Exit mobile version