घरCORONA UPDATEनागपूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, १२५ जणं क्वारंटाईन!

नागपूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, १२५ जणं क्वारंटाईन!

Subscribe

उपराजधानी नागपूरमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये देखरेख करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्यांनाच आता कोरोनाची लागण झाली आहे. काल संध्याकाळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. उपजिल्हाधिकाऱ्यांच कार्यालय यामुळे सील करण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेले इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

क्वारंटाईन सेंटरमध्ये देखरेख करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. साधाराण १२५ जणं त्यांच्या संपर्कात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये आले होते. सध्या तरी या सगळ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात प्रत्येकाची चाचणी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आता प्रशासनातील अधिकारी किंवा ज्यांच्यावर कोरोनाबाधितांची जबाबदारी आहे अशा लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नागपूरमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ६४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २६६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ८४ हजार २८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ५८ हजार १४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


हे ही वाचा- भारतीय राखी वापरून साजरा करा रक्षाबंधन, यावर्षी चीनी राखीला ‘नो एन्ट्री’!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -