पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवरून आम आदमी पक्षाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवरून आम आदमी पक्षाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माझ्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने उत्तर दिलंय की, २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने पेट्रोलचे दर ७८ वेळा आणि डिझेलचे दर ७६ वेळा वाढवले आहेत. तसेच त्यांचा इतर वस्तूंच्या किंमतीवर देखील परिणाम होत आहे, असं राघव चढ्ढा म्हणाले.

केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या सरकारने अटल सरकारपासून धडा घ्यावा, असा सल्ला राघव चढ्ढा यांनी केंद्र सरकारला दिला आहे. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी एनडीएचे पंतप्रधान होते. तेव्हा सत्ताधारी सरकारसह विरोधकांचाही तितकाच आदर केला जात होता.

केंद्र सरकारने २०१६ ते २०२२ दरम्यान इंधनावर लावण्यात आलेल्या उत्पादन शुल्कातून १६ लाख कोटी रूपये कमावले आहेत. मात्र, केंद्र सरकारला महागाईवर लक्ष द्यायचे नाही. कारण एका वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणूस खरेदी करणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या किमतीत फरक पडतो, असं राघव चढ्ढा म्हणाले.

राघव चढ्ढा यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की, पेट्रोलच्या किमती २६ जून २०१० आणि १९ ऑक्टोबर २०१४पासून बाजारात निश्चित करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत शिवभक्त, कांदा-लसूणही वर्ज्य


 

First Published on: July 25, 2022 10:02 PM
Exit mobile version