Extortion Case : परमबीर सिंह चंदीगढमध्ये ? अचानक सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह

Extortion Case : परमबीर सिंह चंदीगढमध्ये ? अचानक सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह

वैद्यकीय रजा काढून सुट्टीवर गेलेले गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग हे त्यानंतर गुढरीत्या गायब झाले होते. ना त्यांचा मोबाईल फोन ऍक्टिव्ह होता नाही ते कुठल्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते. सिंग यांच्यावर मुंबईत तसेच ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त संपर्कात येत नव्हते. परमबीर सिंग हे देश सोडून गेल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या, मात्र ठाम पणे कोणीही सांगू शकत नव्हते की परमबीर सिंग आहे तरी कुठे ? पण आज बुधवारी दुपारी अचानक परमबीर सिंग यांच्या मोबाईल फोन सुरू झाला व ते व्हाट्सएप आणि टेलिग्राम वर ऍक्टिव्ह असल्याचे दिसले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला येत्या ६ डिसेंबरपर्यंत परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान परमबीर सिंह हे चंदीगढमध्ये असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे.

परमबीर सिंग यांचा मोबाईल अनेक महिन्यानंतर अॅक्टिव्ह

परमबीर सिंह अॅक्टिव्ह असल्याचे बघून अनेकांनी त्यांना मेसेज केले. मात्र त्यांनी कुणालाही उत्तर दिले नाही किंवा कुणाचा फोन देखील ते उचलत नव्हते. मुंबई गुन्हे शाखेकडे असलेल्या गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्हयात परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरार घोषित केले तसेच त्यांना ३० दिवसांचा वेळ दिला आहे. या ३० दिवसात सिंग हजर झाले नाही तर त्यांच्या संपत्तीवर टाच येऊ शकते असे ही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. त्यानंतर अचानक बुधवारी परमबीर सिंग हे सोशल मीडिया आणि मोबाईलवर रीचेबल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

परमबीर सिंग किल्ला न्यायालयाच्या आदेशाला घाबरून शरण येण्याची शक्यता वर्तवली जात असून अशी चर्चा देखील सुरू आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर परमबीर सिंग यांचा फोन ऍक्टिव्ह. सुप्रीम कोर्टाने परमबीर यांच्यावर तूर्तास कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिलेत. परमबीर सिंग यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात माहिती दिली होती की जर कोर्टाने आदेश दिले तर ४८ तासात सीबीआयकडे शरण जायला तयार आहे.


Parambir Singh : परमबीर सिंह भारतातच, पण मुंबई पोलिसांकडून जिवाला धोका

First Published on: November 24, 2021 5:50 PM
Exit mobile version