मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना…; श्रद्धा हत्या प्रकरणावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना…; श्रद्धा हत्या प्रकरणावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब पूनावाला याने तिची हत्या करत शरीराचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. या हत्याकांडामुळे अवघा देश हादरून गेला आहे. या हत्याकांडाच्या तपासामध्ये आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

श्रद्धाच्या प्रियकराने थंड डोक्याने प्लॅन करत तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि मध्यरात्री 2.30 वाजता शरीराचा एक एक तुकडा जंगलात जाऊन फेकून देत होता, कोणी व्यक्ती इतका निर्दयी असा कसा असू शकतो? असा प्रश्न हत्याकांडावर उपस्थित होत आहे. या घटनेवर आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिची पोस्ट चर्चेत आली आहे.

केतकी चितळेने या पोस्टमधून आपला संताप व्यक्त केला आहे. केतकीने फेसबुक आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट केली आहे. ज्यात केतकीने लिहिले की, मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात ? !!!? #जागोमेरेदेश ।।जय हिंद।। ।। वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय ।।

हत्येपूर्वी आफताबने गुन्ह्यासंदर्भातील अनेक वेबसिरीज आणि चित्रपट पाहिले, ज्याच अमेरिकन वेबसिरीज डेक्स्टर हिचा समावेश आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. डेक्स्टर वेब सिरीजवरून प्रेरणा घेत त्यांने हा खून केल्याचे समोर आले आहे. यावर केतकी चितळेने आपलं परखड मत मांडल आहे. श्रद्धासारख्य़ा किती मुलींचा बळी जाणार असा सवाल तिने उपस्थित केला आहे. दरम्यान आफताबने अनेकदा तिला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती. दरम्यान तिने आपला जीव जाऊ शकतो, अशी सूचना मित्रांनी दिली होती. याचसंदर्भात आता केतकीने मुलींना तिच्या या पोस्टमधून मेसेज दिला आहे. केतकीच्या पोस्टची सोशल मिडियावर चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टचं समर्थन केलंय.


हेही वाचा : आता वशिलेबाजी चालणार नाही; निवडणुकीबाबत राऊतांनी उमेदवारांना ठणकावले


First Published on: November 16, 2022 10:07 AM
Exit mobile version