अशी असेल ‘अॅडव्हेंचर पर्यटनाची’ संकल्पना

अशी असेल ‘अॅडव्हेंचर पर्यटनाची’ संकल्पना

ऍडव्हेंचर पर्यटनाची पत्रकार परिषद

मध्यप्रदेश पर्यटन ने आशियातील आयोजित अॅडव्हेंचर पर्यटनक्षेत्रात पहिल्यांदाच नवीन आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान, विशेष बैठकी, शैक्षणिक सत्र (चौक बाजार) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परदेशातील प्रतिनिधी आणि प्रवक्ते या सत्रात सहभागी झाले आणि ऍडव्हेंचर पर्यटन क्षेत्रात नेटवर्किंग संधींबद्दल चर्चा केली. या परिषदेमध्ये एकूण २०० पेक्षा जास्त लोक ज्यामध्ये विक्रीदार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील मीडिया,हॉस्पिटॅलिटी व टूर ऑपरेटर संघांचे प्रतिनिधी तसचे ऍडव्हेंचर टूर ऑपरेटर असोसिएशनचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. भारत सरकार पर्यटन मंत्रालयाचे संयुक्त सचिव माननीय सुमन बिल्ला, एटीओएआयचे अध्यक्ष स्वदेश कुमार आणि एडवेंचर नेक्स्ट कमेटीचे अध्यक्ष कुमारसह अन्य मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ऍडव्हेंचर पर्यटनाची संकल्पना सांगण्यात आली.

” सर्वव्यापी ऍडव्हेंचर पर्यटनाचे आयोजन पहिल्यांदाच भारतात होत आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन मध्यप्रदेशात होत आहे ही आमच्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. आशियातील सर्वात सर्व आंतरराष्ट्रीय विक्रीदार , मीडिया आणि राष्ट्रीय प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्यांचे आम्ही आभार मानतो. अॅडव्हेंचर नेक्स्टच्या निमित्ताने भारतातील पर्यटन क्षेत्राची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे “- मध्यप्रदेश पर्यटन विभागाचे प्रधान सचिव आणि व्यवस्थापन संचालक मंत्री, हरी रंजन राव 

”मध्यप्रदेश पर्यटनासोबत आम्हाला अडव्हेंचर नेक्स्ट २०१८ चे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत . मध्यप्रदेशात ऍडव्हेंचर पर्यटनाला प्रचंड वाव आहे. ऍडव्हेंचर नेक्स्ट च्या निमित्ताने भारताच्या धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा, वन्यजीव आणि वास्तुकला यावर विशेष प्रकाश टाकण्यात येईल. आगामी दिवसांत देशातील विविध भागांमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा विचार एटीटीए करत आहे.”- ऍडव्हेंचर नेक्स्ट आणि ऍडव्हेंचर ट्रॅव्हल असोसिएशन चे प्रमुख कार्यकारी अधिकारी,  शॅनन स्टोव्हल 

First Published on: December 7, 2018 10:12 AM
Exit mobile version