काबुलमध्ये विमानातून पडल्याने अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूचा मृत्यू

काबुलमध्ये विमानातून पडल्याने अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूचा मृत्यू

काबुलमध्ये विमानातून पडल्याने अफगाणिस्तानचा फुटबॉलपटू झाकी अन्वारीचा मृत्यू

काबुल विमानतळावर अमेरिकेच्या लष्करी विमानातून पडल्याने अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूचा सोमवारी मृत्यू झाला. याबाबतची माहिती अफगाणिस्तानमधील वृत्तसंस्था अरिआनाने गुरुवारी दिली. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केली. यावेळी अमेरिकेच्या C-17 लष्करी विमानात प्रवेश न मिळाल्याने घाबरलेल्या काही नागरिकांनी विमानाच्या चाकावर बसण्याचा, तर काहींनी विमानाच्या खालच्या बाजूला पकडून राहण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही. विमानाने उड्डाण करताच तिघे जण विमानातून खाली पडले आणि यात एका फुटबॉलपटूचा समावेश होता.

झाकी अन्वारी असे फुटबॉलपटूचे नाव 

झाकी अन्वारी असे या १९ वर्षीय फुटबॉलपटूचे नाव असून त्याचा विमानातून पडून मृत्यू झाल्याची माहिती अरिआना वृत्तसंस्थेने दिली आहे. क्रीडा प्राधिकरणाने या माहितीला दुजोरा दिला आहे. रविवारी, १५ ऑगस्टला तालिबान्यांनी काबुल शहरावर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या हजारो नागरिकांनी देश सोडण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या लष्करी विमानातून काही नागरिकांना देशाबाहेर नेण्यात आले. परंतु, विमानात प्रवेश न मिळाल्याने काहींनी विमानाच्या चाकावर बसून किंवा खालच्या बाजूला लटकून राहण्याचा प्रयत्न केला. तसे करत असतानाच तीन जणांचा विमानातून पडून मृत्यू झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हेही वाचा – तालिबानचे महिलांसाठी १० क्रुर नियम


First Published on: August 19, 2021 10:59 PM
Exit mobile version