घरदेश-विदेशतालिबानचे महिलांसाठी १० क्रुर नियम; हाय हिल्स, नेलपेंट वापरल्यासह छाटले जातात अवयव

तालिबानचे महिलांसाठी १० क्रुर नियम; हाय हिल्स, नेलपेंट वापरल्यासह छाटले जातात अवयव

Subscribe

अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवादी संघटनेनं ताबा मिळवताच तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होतेय. या अफगाणी नागरिकांनी हुकूमशाही राजवटीखाली जगण्यापेक्षा देश सोडून जाणे स्वीकारले आहे. अफगाणीस्तानच्या रस्त्यांवर, विमानतळावर नागरिकांची देश सोडून जाण्यासाठी धडपड सुरु आहे. तर दुसरीकडे तालिबानी दहशतवाद्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय. याचवेळी अफगाणमधील शहारांत लूटमारीसह घराघरात शिरुन मुलींपासून ते अनेक विवाहीत महिलांवर अमानुष लैंगिक अत्याचार केले जातायत.

अफगाणिस्तानमध्ये २० वर्षापूर्वीचे ‘काळे दिवस’ 

२००१ पूर्वी अफगाणिस्तानवर तालिबान सत्तेवर असताना महिलांवर खूप अमानवी अत्याचार करण्यात आले. त्यामुळे २० वर्षापूर्वीचे काळे दिवस परिस्थिी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. या महिलांना दैनंदिन जीवन जगताना तालिबान्यांचे नियम पाळावे लागतात. तसेच नियम न पाळणाऱ्या महिलांना कठोरातली कठोर शिक्षा सुनावली जाते. तर वेळीप्रसंगी जीवही घेतला जातो.

- Advertisement -

यात तालिबानच्या शरिया कायद्यातही महिलांसाठी अत्यंत कठोर आणि अमानुष कायदे नियम आहेत. या कायद्यामुळे मानवाधिकारचं उल्लंघन होत असून महिलांचे अधिकार हिरावून घेतले जातात.

तालिबानचे महिलांसाठीचे १० क्रुर नियम: 

१) महिलांना घराबाहेर पडताना बुरखा घालणं बंधनकारक आहे.

- Advertisement -

२) महिलांना नातेवाईकांकडे जाण्यासाठी सोबत वडील, भाऊ, पती किंवा पुरुष असणे गरजेचं असतं.

३) पुरुषांना महिलांच्या चालण्याचा किंवा पावलांचा आवाज ऐकू येऊ नये यासाठी महिलांना हाय हिल्स सँडल्स घालण्यास बंदी आहे.

४) सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांना महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये

५) घरातील महिलांना कोणी पाहू नये यासाठी तळमजल्यावरील घरांच्या खिडक्या पारदर्शन नसाव्यात. त्यावर रंग असावा.

६) महिलांना फोटो काढण्यास बंदी, तसेच वर्तमान पत्र, पुस्तकात महिलांचे फोटो छापणेही गुन्हा, घरात फोटो लावण्यास बंदी

७) कोणत्याही ठिकाणाच्या नावात महिलेचे नाव असल्यास तो काढून काढणे बंधनकारक

८) बाहेरच्य़ा अनोळखी व्यक्ती पाहू नये यासाठी महिलांना बाल्कनी किंवा खिडकीतही उभं राहण कायद्याने गुन्हा

९) सार्वजनिक कार्यक्रमांपासून महिलांना मज्जाव

१०) महिलांनी बोटांना नेलपेंट लावणे गुन्हा, तसेच स्वच्छेने लग्न केल्यास कठोर शिक्षा

नियम न पाळणाऱ्या महिलांसाठी तालिबनाच्या क्रुर शिक्षा: 

तालिबानच्या क्रुर शिक्षेमुळे महिलांना त्यांचे अस्तित्वचं नकोसे वाटू लागले. कारण नियम तोडणाऱ्या महिलांना तालिबानी क्रुर आणि अमानवी शिक्षेस भाग पाडतात.

१) व्यभिचार आणि अनैतिक संबंधांसाठी महिलांना सार्वजनिक ठिकाणी मारझोड केली जाते.

२) घट्ट कपडे घातल्यास हत्या केली जाते किंवा कठोर शिक्षा सुनावला जाते.

३) लग्नास नकार देत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचे नाक किंवा कान छाटले जाते.

४) नेलपेंट लावल्यास बोटं कापली जातात.

तालिबान राजवटीतील अशा क्रुर शिक्षा ऐकून महिलांना जीवन जगणं असह्य झालं आहे. आजही तालिबानमध्ये महिलांना त्यांच्या जगण्याच्या अधिकारापासून दूर ठेवले जाते.


जीव वाचवण्यासाठी काबूलमध्ये नागरिकांची धावाधाव, तालिबान्यांचा बेछूट गोळीबार

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -