Afghanistan Crisis: तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा करताच भारतातील ड्राय फ्रूट्सचे का वाढले दर?

Afghanistan Crisis: तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा करताच भारतातील ड्राय फ्रूट्सचे का वाढले दर?

Afghanistan Crisis: तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा करताच भारतातील ड्राय फ्रूट्सचे का वाढले दर?

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) खूप मोठे बदल होत आहेत. तालिबानने (Taliban) काबुलवर (Kabul) कब्जा करताच हळूहळू अफगाणिस्तानमध्ये बदल होत आहेत. एकीकडे अफगाणिस्तानमध्ये तालिबानी विजय झाल्यामुळे जल्लोष करत आहेत, तर दुसरीकडे अफगानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा भारतातील व्यापारावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील ड्राय फ्रूट्सचे (सुक्या मेव्याचे) दर वेगाने वाढत आहेत. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या उलथा-पालथनंतर ड्राय फ्रूट्सची आयात विस्कळीत झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये ड्राय फ्रूट्सचे दर खूप वाढले आहेत.

१५ दिवसांपासून ड्राय फ्रूट्सची आयात ठप्प

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधून पिस्ता, बदाम, अंजीर, अक्रोडसारखे अनेक ड्राय फ्रूट्सची मागणी केली जाते. गेल्या १५ दिवसांपासून अफगाणिस्तानातून आयात झालेली नाही. यामुळे बाजारात ड्राय फ्रूट्स तुटवडा होता आहे.

जम्मू ड्राय फ्रूट्स रिटेलर असोसिएशनच्या अध्यक्ष ज्योति गुप्ता म्हणाल्या की, गेल्या महिन्याभरापासून अफगाणिस्तानातून आयातीत अडथळा येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून अफगाणिस्तानातून कोणतेही सामान येत नाही आहे. यामुळे भारतात ड्राय फ्रूट्सचे दर वाढले आहेत.

गेल्या वर्षापासून अफगाणिस्तानातून ड्राय फ्रूट्सच्या आयातीत वाढ झाली होती. अफगाणिस्तातून भारतात येणाऱ्या निर्यातीमध्ये ९९ टक्के वाटा कृषी आणि संबंधित उत्पादनांचा आहे. परंतु आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानातील सत्ता तालिबानने काबीज केले आहे. यामुळे आता भारत आणि अफगाणिस्तानातील व्यापारी संबंधांवर परिणाम होऊ शकतो. भारतासाठी अफगाणिस्तान ड्राय फ्रूट्ससाठीचा एक मोठा स्रोत आहे. पण सध्या ड्राय फ्रूट्सची आयात होत नसल्यामुळे त्यामुळे येत्या दिवाळीत अडचणीला सामोर जावे लागणार आहे.


हेही वाचा – Afghanistan: काबुलहून C-17 विमान भारतीय राजदूतासह १२० लोकांना घेऊन गुजरातमध्ये दाखल


 

First Published on: August 17, 2021 2:14 PM
Exit mobile version