Afghanistan: मुलांना जन्म देणं एवढंच महिलांचं काम, त्या कधीही मंत्री होऊ शकत नाहीत – तालिबान

Afghanistan: मुलांना जन्म देणं एवढंच महिलांचं काम, त्या कधीही मंत्री होऊ शकत नाहीत – तालिबान

Afghanistan: मुलांना जन्म देणं एवढंच महिलांचं काम, त्या कधीही मंत्री होऊ शकत नाहीत - तालिबान

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अजूनही परिस्थिती स्थिर झालेली नाही आहे. तालिबान्यांची (Taliban) क्रूरता अजूनही कायम आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाले असून महिला सरकारमध्ये हिस्सा मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. पण यादरम्यान तालिबान्यांनी आंदोलन महिलासह, वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक माध्यमाशी बोलताना तालिबान प्रवक्त्याने दावा केला की, ‘कोणत्याही महिलेला मंत्री बनवले जाणार नाही. त्यांनी फक्त मुलं जन्माला घातली पाहिजेत.’

स्थानिक माध्यम टोलो न्यूजने तालिबान प्रवक्ताच्या हवालाने ट्वीट केले आहे की, ‘महिला मंत्री होऊ शकत नाही. हे असे आहे, जसे की आपण तिच्या गळात काही घालतो आणि ते ती सांभाळू शकत नाही. महिलेने मंत्रिमंडळात असणे गरजेचे नाही आहे. त्यांनी फक्त मुलं जन्माला घातली पाहिजे. तसेच महिला आंदोलक संपूर्ण अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करत नाहीत.’

दरम्यान अफगाणिस्तानवर कब्जा करून तीन आठवडे झाले आहेत. तसेच आता तालिबानने सरकार देखील स्थापन केले आहे. पण यामुळे अफगाणिस्तानमधील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यादरम्यान गेल्या दिवसांपासून काबूलसह अनेक प्रांतामध्ये महिला आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

तालिबान सरकार


हेही वाचा – Viral Photo: महिला आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तालिबान्यांनी केली बेदम मारहाण


 

First Published on: September 9, 2021 8:06 PM
Exit mobile version