Taliban: तालिबान्यांची क्रूरता! गोळ्या झाडल्या, डोळे काढले; अफगाण महिलेची कहाणी

Taliban: तालिबान्यांची क्रूरता! गोळ्या झाडल्या, डोळे काढले; अफगाण महिलेची कहाणी

Taliban: तालिबान्यांची क्रूरता! गोळ्या झाडल्या, डोळे काढले; अफगाण महिलेची कहाणी

अफगाणिस्तानमधील महिलांवरील तालिबानाचे अत्याचार कोणापासून लपलेले नाही आहेत. २० वर्षांपूर्वीही तालिबान महिलांविरोधात तिच क्रूरता दाखवत होते आणि आजही त्यांचे विचार आणि कृती त्याच दिशेने जात असल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानमधील दोन अशा महिला ज्यांनी पुढे येऊन काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तालिबानी अत्याचाराचे शिकार झाल्या. त्यांनी ही कहाणी आजतक या वृत्तसंस्थेसोबत शेअर केली आहे.
पहिली कहाणी खातिरा हाशमी यांची आहे. या अफगाणिस्तानमधील पोलीस दलासोबत काम करत होत्या. त्या एक पोलीस इंस्पेक्टर होत्या. त्यांना त्यांच्या कुटुंबियांची पूर्ण साथ होती. परंतु २०२०मध्ये तालिबान्यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. तालिबान्यांना एक महिला पोलिसात काम करत आहे, हे आवडत नव्हते. खातिरा यांच्या पतीला सतत धमकावले जात होते. पत्नीला बाहेर काम करण्यापासून रोखा, असे सांगितले जात होते. परंतु तरीही खातिरा या काम करत राहिल्या. पण तालिबान्यांनी आपला खरा चेहरा दाखवला. तालिबान्यांनी सात त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मग त्यांनी खातिरा यांचे डोळे बाहेर काढले. त्यानंतर खातिरा यांचा मृत्यू झाल्याचे समजून भररस्त्यामध्ये तालिबानी त्यांना सोडून गेले. मग पोलीस खातिराला एका रुग्णालयात घेऊन गेले. बराच काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा आता जीव वाचला असला तरी आपले दोन डोळे त्यांनी गमावले आहेत.
दुसरी कहाणी अफगाण पत्रकार शाहीन मोहम्मदी यांची आहे. त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यांच्यासोबत तालिबान्यांनी भयावह क्रूरता दाखवली होती. बऱ्याच काळापासून त्या अमेरिकासाठी काम करत होत्या. अफगाणिस्तातून अमेरिकन सैनिकासोबत त्या संपर्कात होत्या. परंतु जेव्हा तालिबानला याबाबतची माहिती मिळाली, त्यावेळेस पुन्हा तालिबान्यांची क्रूरता समोर आली. त्यांच्या संपूर्ण चेहरा तालिबान्यांनी बिघडवला. यामुळे शाहीन यांच्या अर्ध्या डोक्यावरचे केस राहिले नाहीत. त्यांनी आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे. शाहीन आजतकसोबत बोलताना म्हणाल्या की, ‘तालिबान अल्लाहच्या नावाखाली महिलांसोबत अत्याचार करतात.ट

हेही वाचा – Afghanistan Crisis: गोळीबार करत तालिबान्यांचा विकृत जल्लोष; लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू


 

First Published on: September 4, 2021 7:14 PM
Exit mobile version