Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Afghanistan Crisis: गोळीबार करत तालिबान्यांचा विकृत जल्लोष; लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू

Afghanistan Crisis: गोळीबार करत तालिबान्यांचा विकृत जल्लोष; लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

तालिबान्यांनी (Taliban) आता पंजशीर (Panjshir) खोऱ्यात कब्जा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंजशीर खोऱ्यात तालिबान्यांची घुसखोरी सुरू होती, अखेर त्यांनी पंजशीर ताब्यात घेतला आहे. त्यामुळे काबूलमध्ये (Kabul) गोळीबार करून तालिबान्यांनी जल्लोष साजरा केला. पण या गोळीबारात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानमधील पत्रकार जियार खान याद यांनी काबुलमधील जल्लोष करतानाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

स्थानिक अफगाण वृत्तसंस्था असवाकाच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तालिबानच्या जल्लोषात झालेल्या गोळीबारामुळे काबूलमधील लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी काबूलमध्ये जल्लोषादरम्यान गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा तालिबान्यांनी दावा केला की, त्यांनी पंजशीर खोऱ्यात कब्जा केला आहे आणि अफगाणिस्ताच्या राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चा (एनआरएफए)ला हरवले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेले अनेक फोटो आणि व्हिडिओमध्ये जखमी झालेल्या लोकांना कुटुंब रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे.

- Advertisement -

तालिबान्यांच्या एका अधिकाऱ्याने दावा केला आहे की, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चाला (NRFA) हरवले आहे. अल्लाहच्या कृपेने पूर्ण अफगाणिस्तान आमच्या नियंत्रणात आले आहे. पंजशीर आमच्या नियंत्रणाखाली आले आहे. पण अजूनही तालिबानने पंजशीरमधील परिस्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. पण एएफपी या वृत्तसंस्थेने स्थानिक रहिवाशांच्या हवाल्याने म्हटले की, पंजशीरमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्याचे वृत्त खोटे आहे.


- Advertisement -

हेही वाचा – तालिबानला धक्का : बंडखोरांनी हिसकावले दोन प्रांत


 

- Advertisement -